गणेशोत्सवाच्या संध्येला चंद्रपुरात निघाली तलवार

0
40

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात एकीकडे गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्याची तयारी सुरू असताना शहरात एक इसम तलवारी हातात घेत दहशत माजवीत होता .
स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेने त्या इसमाला ताब्यात घेत त्याचेंजवळून तलवारी व खंजर जप्त करण्यात आल्या . 31 ऑगस्टला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना गोपनीय माहिती मिळाली की महाकाली कॉलरी परिसरात एक युवक हातात तलवार घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत आहे . माहितीच्या आधारे खाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि संदीप कापडे यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचाऱ्यांना पाठविले असता पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने अटक केली व त्याची विचारपूस केली असता त्याने आपलं नाव व्यंकटेश उर्फ व्यंक्या कोपेलवार रा . आनंदनगर महाकाली वार्ड असे सांगितले .गुन्हे शाखेने धारदार तलवार ताब्यात घेत त्याच्या घराची झडती घेतली असता 3 तलवारी व खन्जर मिळून आल्या , आरोपी व्यंकटेश ने सांगितले की सदर तलवार त्याच्या मित्रांनी दिल्या आहे . व्यंकटेश च्या दोन्ही मित्रांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही .
आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला . सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सपोनि संदीप कापडे , पोउपनी अतुल कावळे , संजय आतकुलवार , नितीन रायपूरे व रवींद्र पंधरे यांनी केली . पुढील तपास शहर पोलीस करीत आहे .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here