*कच्ची खिचडी कशी खाऊ? विद्यार्थ्यांचा थेट गुरुजींना सवाल*

0
47

*बल्लारपूर*:- येथील नगरपरिषद शाळेतील शिक्षक सोमवारी कंत्राटदाराने शाळेच्या मुलांना भलताच आहार दिल्याने हैराण झालेले शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर कच्ची खिचडी कशी खाऊ? असा सवाल करतच शिक्षकांनी या प्रकरणाची तक्रार पंचायत समितीकडे केली हा प्रकार सोमवारी सकाळी घडला सध्या स्थिती राज्यातील कोविड-19 च्या पादुभवाची स्थिती नियंत्रणात आल्याने राज्यातील योजनेस पात्र शाळांमधील येत्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना 15 मार्चपासून शाळा स्तरावर तयार आहार देण्याच्या निर्णय राज्य सरकारने घेतला आहे हे काम शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शालेय पोषण आहार शिजवण्याची काम महिला बचत गट गरजू महिला तसेच एनजीओकडून केले जाते सोमवारी नगरपरिषद्वारा संचालित राणी लक्ष्मीबाई प्राथमिक शाळा शहीद भगतसिंग शाळा विजयालक्ष्मी पंडित सुभाष चंद्रबोस व डॉ. जाकिर हुसेन प्राथमिक शाळा या शाळेतील सकाळच्या पाळीतील मुलांना मेनू प्रमाणे आहार न देता खिचडी दिली ती खिचडी कच्ची शिजलेली असल्यामुळे मुलांनी खाल्ली नाही व सर्व खिचडी फेकण्यात गेली व मुलांना उपाशी राहावी लागले शाळेतील शिक्षक सुदाम राठोड यांनी सांगितले की याची तक्रार पंचायत समितीच्या शालेय पोषण आहार अधिकारी दुपारे यांना केली परंतु त्यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केले सोमवारपासून शनिवार पर्यंत दर दिवशी वेगवेगळे आहार असतो पण सोमवारी वरणभात ऐवजी खिचडी देण्यात आले तेही कच्ची तर काही शाळांना दिली नाही त्यामुळे शिक्षक हैराण झाले

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here