स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : जिल्हा व तालुका स्तरावरील उपक्रमांमध्ये गडचिरोली जिल्हयाने पटकावला राज्यात प्रथम क्रमांक

0
50

गडचिरोली , 1 सप्टेंबर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम अंतर्गत आयोजित उपक्रमांची संख्या व त्याची माहिती संकेतस्थळावर भरण्यात संपुर्ण देशात महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला असुन त्यामध्ये राज्यात गडचिरोली जिल्हयाने जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे . स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम निमीत्ताने 12 मार्च 2021 ते 15 ऑगष्ट 2022 या कालावधीत देशभरात विविध उपक्रम आयोजित करण्याचे निश्चीत करण्यात आले . तसेच आयोजन केलेल्या उपक्रमांची माहिती खास अमृत महोत्सवासाठी तयार करण्यात आलेल्या https://indiaat7s.nic.in या संकेतस्थळावर भरणे अपेक्षित होते . त्यामध्ये संपुर्ण भारतातुन ग्रामपंचायत , तालुका , जिल्हा व राज्य या चारही स्तरांवर सर्वात जास्त 404282 इतक्या उपक्रमांचे आयोजन करुन या संकेतस्थळावर माहिती भरून महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकाविला आहे . गडचिरोली जिल्हयाने सदर संकेतस्थळावर जिल्हास्तर उपक्रमांच्या 745 नोंदी व तालुका स्तर उपक्रमांच्या 6993 नोंदी अपलोड करुन राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे .
या उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाने नोडल म्हणुन कार्य करताना सर्व जिल्हा स्तरावर उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत ) व तालुका स्तरावर गट विकास अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणुन नेमणुक केली होती . गडचिरोली जिल्हयामध्ये सदर उपक्रम उत्स्फुर्ततेने व यशस्वीरित्या राबविण्याकरीता जिल्हा परिषद , गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद ( भा.प्र.से ) यांनी विशेष नियोजन करून ग्राम पंचायत स्तर , पंचायत समिती स्तर तसेच जिल्हा परिषद स्तरावर झालेल्या जास्तीत जास्त उपक्रमांचे अपलोडींग संकेतस्थळावर करणेबाबत सर्वांना जबाबदारी वाटुन देऊन ते कार्य पुर्णपणे यशस्वी करुन घेण्याचे कार्य केले . स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी उपक्रमांमध्ये 1 ) विशेष ग्रामसभा 2 ) डिस्ट्रीक्ट डिजीटल रिपॉझेटरी 3 ) प्रभात फेरी 4 ) सायकल / तिरंगा रॅली 5 ) विविध निबंध , वकृत्व व चित्रकला स्पर्धा 6 ) हर घर तिरंगा उपक्रम 7 ) पुरातत्व वारसा स्थळांना भेटी 8 ) शासकीय इमारतींवर तिरंगी विद्युत रोषनाई 9 ) स्वच्छता मोहिम 10 ) महिला व किशोरी मेळावे 11 ) भ्रमणध्वणी दुष्परीनाम मार्गदर्शण 12 ) गोपाळांची पंगत 13 ) वृक्षारोपन 14 ) पर्यावरण संवर्धण शपथ 15 ) सांस्कृतीक कार्यक्रम 16 ) स्वराज्य सप्ताह फेरी
17 ) 25 अमृत सरोवरांचे पुनर्जिविकरण व तेथे ध्वजारोहन 18 ) सामुहिक राष्ट्रगीत गायन आदी कार्यक्रमाचा त्यामध्ये समोवश होता . त्याचेच फलीत म्हणुन गडचिरोली जिल्हयाला राज्य स्तरावर वरील क्रमांक प्राप्त झालेले दिसुन येते . सदर उपक्रमांकरीता अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र एम . भुयार , उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत ) रविंद्र कणसे तसेच सर्व तालुक्यातील गट विकास अधिकारी यांनी सहकार्य केले . जिल्हयाला राज्यात उक्त क्रमांक मिळाल्याने सर्व स्तरावर जिल्हा परिषद , प्रशासनाचे अभिनंदन करण्यात येत आहे . – विविध संघटना व गट विकास अधिकारी यांचे उत्स्फुर्त सहकार्य गडचिरोली सारख्या दुर्गम व आदिवासी जिल्ह्यात संदर उपक्रम उत्तम प्रकारे राबविणे हि फारच प्रशंसनीय व अभिमानास्पद बाब आहे . त्यातच जिल्हा नक्षल प्रभावित असुनसुध्दा गट विकास अधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व शिक्षक कर्म . संघटना , ग्रामसेवक संघटना , व्यापा संघटना यांनी घरोघरी तिरंगा फडकविणेकरीता मोलाचे योगदान दिल्यामुळेच सदर उपक्रम यशस्वीरित्या पार पाडता आला . भविष्यात सुध्दा या संघटनांकडुन असेच सहकार्य लाभेल हि अपेक्षा .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here