अध्यात्मिक व सामाजिक चळवळ पुढे नेणारे निर्मला देवी सहज योग ध्यान मंदिर सोयी सुविधायुक्त करणार – आ. किशोर जोरगेवार

0
41

मोरवा येथील निर्मलनगरित सिमेंट कॉंक्रीट मार्गाचे लोकार्पण सोहळा

 

निर्मला देवी यांनी निराधार महिला आणि मुलांसाठी घरे बांधली, अनेक आंतरराष्ट्रीय शाळा, आरोग्य, संशोधन केंद्र, शास्त्रीय संगीत आणि ललित कला यांना प्रोत्साहन देणारी आंतरराष्ट्रीय अकादमी यासह अशासकीय संस्था स्थापन केल्या. त्यांचा वसा आता ध्यान केंद्रांद्वारे पूढे नेल्या जात आहे. मोरवा येथील ध्यान मंदिरही याचेच एक प्रतिक असुन अध्यात्मिक आणि सामाजिक चळवळ पुढे नेणारे हे निर्मला देवी सहज योग ध्यान मंदिर सोयी सुविधायुक्त करणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

आमदार निधीतुन ५० लक्ष रुपये खर्च करत ध्यान मंदिराकडे जाणा-या मार्गाचे सिमेंट काॅंक्रिटीकरण करण्यात आले. आज या मार्गाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे अजय जयसवाल, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, सरपंच्या स्नेहा साव, उपसरपंच भुषण पिदुरकर, सदस्य अजय कोवे, ज्योती गिरडकर, गुंदन वरखडे, मुकेश अतकारी, सुकशनी डोर्लीकर, मनिष रासेकर, मंजुशा मुसळे, ग्रामसेवक वर्धन गणविर, पोलिस पाटील नरेन्द्र डोर्लीकर, तंटामुक्ती अध्यक्ष विनोद मुसळे, ईश्वर विरुटकर आदिंची उपस्थिती होती.

यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, मोरवा येथील हे ध्यान मंदिर अनेकांच्या श्रध्देचे स्थान आहे. मात्र येथे पोहचण्याकरिता मार्ग नव्हता ही अडचण लक्षात येताच आपण ५० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करुन देत त्या कामाचे भुमिपूजन केले होते. आज हा मार्ग तयार झाला आहे. आज या मार्गाचे लोकार्पण होत असतांना समाधान वाटत आहे. मात्र येथे पुढेही विकास कामे सुरुच राहतील. येथील भोजनकक्ष अत्याधुनिक करण्याची गरज आहे. यासाठी आपण २५ लक्ष रुपये देणार असल्याची घोषणाही यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.

निर्मला देवी या सहजयोग ध्यान साधनातंत्राच्या आणि एका नव्या धार्मिक व आध्यात्मिक चळवळीच्या संस्थापक होत्या. त्यांनी सामूहिक आत्म-साक्षात्कार देण्याची पद्धत विकसित केली. सर्व मानवांमध्ये सुप्त आध्यात्मिक उर्जा जागृत करणे त्यांना योगा शिकवणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे अशी त्यांची आस्था होती. त्यांच्या वसा आताही ९५ हून अधिक देशांमध्ये स्थापन केलेल्या ध्यान केंद्रांद्वारे पूढे नेल्या जात आहे. जिथे नेहमीप्रमाणे सहज योग शिकवला जातो. याची पून्हा व्याप्ती वाढेल अशी आशाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी बोलुन दाखवली. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here