*आरुषी सोशल वर्क फाउंडेशन , चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांची भरीव कामगिरी*

0
40

स्त्री शक्तीच्या सहाय्याने सामाजिक बांधिलकीचे व्रत जोपासणारे व्यावसायिक महिला डॉक्टर जर्मनी मधील “ आयर्न मॅन ” सारख्या अद्वितीय अशा कठीणतम स्पर्धा जिंकून येतात , तेव्हा स्वाभिमानाने छाती फुलून यावी एवढा आनंद होतो . ● आरुषी सोशल वर्क फाउंडेशन , चंद्रपूरच्या अध्यक्षा डॉ . सौ . कल्पना गुलवाडे व सचिव डॉ . सौ . प्राजक्ता अस्वार यांनी हि कामगिरी बजावली आहे . तसेच कु . नबा इरशादअली शिवजी हिने कोवळ्या वयात हा मान मिळविला . स्त्री शक्तीने मनात आणले तर अशक्य गोष्ट शक्य करून दाखवू शकते , हे यांनी सिद्ध करून दाखविले आहे .
उपरोक्त औचित्य साधून आरुषी सोशल वर्क फाउंडेशन , चंद्रपूरच्या संस्थापक अध्यक्षा डॉ . सौ . प्रेरणा कोलते , माजी अध्यक्ष डॉ . नसरीन मावानी , माजी सचिव डॉ . सौ . रुजुता मुंधडा , विद्यमान सहसचिव श्रीमती खदिजा अली , कोषाध्यक्ष डॉ . नरेंद्र कोलते , संस्थेच्या सदस्या डॉ . पल्लवी इंगळे , डॉ . प्रीती चव्हाण , श्रीमती लैला रयानी ह्यांनी वरील मंडळींचा सत्कार केला व त्यांना गौरवान्वित केले . या कार्यक्रमाला विजेते स्पर्धक कु . नबा इरशादअली शिवजी ह्यांनी आपले अनुभव बोलून दाखविले . तसेच संतोष इसमपेल्लीवार यांची या कार्यक्रमाला भरघोस मदत झाली .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here