महाराष्‍ट्र ऑटो-रिक्षा चालक मालक संघटनेचे ना. सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन सादर

0
120
महाराष्‍ट्र ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेच्‍या वतीने दि. ०४.०९.२०२२ रोजी महाराष्‍ट्र राज्‍याचे वनेसांस्‍क़तिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या जनसंपर्क कार्यालयात ऑटोरिक्षा चालकांचे मागण्‍याबाबत बैठक घेण्‍यात आली. बैठकीत सर्व ऑटोरिक्षा पदाधिका-यांनी राज्‍यामध्‍ये कल्‍याणकारी महामंडळ स्‍थापित व्‍हावेयाकरीता मागील २० वर्षापासून पाठपुरावा सुरु आहे. त्‍या मागणीला धरुन मागील राज्‍याचे अर्थमंत्री असताना राज्‍यातील ऑटोरिक्षा चालकांनी कल्‍याणकारी ऑटोरिक्षा महामंडळाचे स्‍थापना करण्‍यात यावीया महामंडळाचे तरतुदीकरीता ५ कोटी रु. घोषणा ही मागील अर्थसंकल्‍पात करण्‍यात आली होती. पण त्‍याचे अंमलबजावणी अजुनही झालेली नाही. त्‍याकरीता राज्‍यातील ऑटोरिक्षा चालकांना न्‍याय मिळवुन देण्‍याकरीता आपण स्‍वतः पुढाकार घ्‍यावा अशी मागणी महाराष्‍ट्र ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेचे संस्‍थापक अध्‍यक्ष राजेंद्र खांडेकर त्‍यांनी आपल्‍या मनोगतात व्‍यक्‍त केली. त्‍यावर महाराष्‍ट्र राज्‍याचे वनेसांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री यांनी येत्‍या महिन्‍याभरात राज्‍यातील ऑटोरिक्षा चालकांची सामुहिक बैठक मुंबई मंत्रालयात घेवु त्‍यावर तोडगा काढु असे ठोस आश्‍वासन दिले. तसेच गृहनिर्माण संस्‍था म्‍हाडा कॉलनीमध्‍ये १०० घरे अलॉटमेंट झालेली होती. त्‍यातील काही घरे बाकी असल्‍यामुळे त्‍यावरही मुंबई मंत्रालयात बैठक घेवुन त्‍वरित ऑटोरिक्षा चालकांना उर्वरीत घरे प्रदान करुन असेही ठोस आश्‍वासन दिले. या शिष्‍टमंडळात राज्‍याचे संघटन प्रमुख राजेंद्र खांडेकरजिल्‍हाध्‍यक्ष मधुकर राऊतजिल्‍हा सचिव सुनिल धंदरेशंकर थोरातरवी आंबटकरहरिदास नागापूरेविलास बावणेखुशाल साखरकरप्रशांत उराडेराजु अलगुनवाररमेश पुलीपाकाप्रमोद देऊळकरराजेश पात्रापरमेश्‍वर सरकारसुजित विश्‍वासअमित देवनाथराजु यादवअजगर अली व असंख्‍या ऑटोरिक्षा चालक मालक पदाधिकारी उपस्थित होते. 
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here