यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारप, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, युवा नेते अमोल शेंडे, घुग्घुस शहर संघटक विलास वनकर, जंगलु पाचभाई आदिंची उपस्थिती होती.
आज शिक्षक दिन राज्यभरात साजरा करण्यात आला. यंग चांदा ब्रिगेडच्या वतीनेही आज चंद्रपूर येथील कार्यालयात शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित यंग चांदा ब्र्र्रिगेडच्या पदाधिका-र्यांनी माजी माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. या प्रसंगी उपस्थितांना यंग चांदा ब्रिगेडचे युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारप यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची व शिक्षण विभाग आघाडीच्या पदाधिका-र्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793