तयार होणारा मार्ग ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी वरदान ठरेल – आ. किशोर जोरगेवार

0
30

केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मंजूर साडे सोळा कोटी रुपयांच्या विकास कामाचे खासदार बाळू धानोरकर आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन

मतदार संघाच्या विकासासाठी राज्यासासह केंद्राकडूनही निधी उपलब्ध व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आपल्या मागणी नंतर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी उपलब्ध करुन दिलेल्या १६ कोटी ५४ लक्ष ९६ हजार रुपयातुन तयार होणार असलेला हा मार्ग महत्वाचा असुन सदर मार्ग ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी वरदान ठरेल असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपलब्ध करुन दिलेल्या १६ कोटी ५४ लक्ष ९६ हजार रुपयांच्या विकास कामांचे आज खासदार बाळू धानोरकर आणि  आमदार किशोर जोरगेवार यांच्या शुभ हस्ते घुग्घुस येथे भुमिपूजन करण्यात आले. यावेळी कॉंग्रेसचे ग्रामीण जिल्हाअध्यक्ष प्रकाश देवतळे, घुग्घुस शहराध्यक्ष राजु रेड्डी,  ग्रामीण तालुकाध्यक्ष श्यामकांत थेरे, पवण आगदेरी, रोषण पचारे, कृषी उपन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश चोखारे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कुंभे, उपविभागीय अभियंता प्रकाश अमर शेट्टीवार, ग्रामपंचायत म्हातारादेवीच्या सरपंच संध्या पाटील, यंग चांदा ब्रिगेडचे घूग्घुस शहर संघटक विलास वनकर, इमरान खान, स्वप्निल वाढई, राशेद हुसेन, नकुल वासमवार यांची उपस्थिती होती.

यावेळी आ. जोरगेवार म्हणाले कि  मतदार संघातील प्रमुख मार्गांसाठी आपण मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे. शहरातील प्रमुख मार्गासाठी २० कोटी तर ग्रामीण भागाला शहराशी जोडणा-या  मार्गासाठी नुकताच ६० कोटी रुपयांचा निधी आपण खेचुन आणला आहे. या निधीतुन लवकरच या भागातील कामांना सुरवात होणार आहे. ना. नितीन गडकरी यांच्या केंद्रीय निधीतुन तयार होणार असलेल्या या मार्गाचे भुमिपूजन करत असतांना मागणी पूर्ण करता आली याचा आनंद आहे. मात्र आता येथुन अधिका-र्यांची जबाबदारी अधिक आहे. या मार्गाचे उत्तम आणि नियोजितरित्या नियोजन करत हे काम वेळेत वेळेत पूर्ण करण्याच्या सुचना यावेळी त्यांनी संबधित अधिका-र्यांना दिल्या आहे.

मतदार संघाच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. ग्रामिण भागाला शहराशी जोडणा-या प्रमुख मार्गांसाठी त्यांनी ६० कोटी रुपयांचा निधी खेचुन आणला आहे. दरम्याण घुग्घुस येथील विविध मार्गांसाठी मोठा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. सदर मागणीचा त्यांच्या वतीने सतत पाठपूरावा सुरु होता. विषयाची गांभिर्यता व सततचा पाठपूरावा लक्षात घेत ना. नितीन गडकरी यांनी सदर मार्गांसाठी १६ कोटी ५४ लक्ष ९६ हजारांचा निधी मंजुर केला होता. आज गुरुवारी घुग्घूस येथे या निधीतुन होत असलेल्या मार्गांच्या कामाचे खासदार बाळू धानोरकर आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले. सदर निधीतुन ताडाळी – साखरवाही – घूग्घूस – नकोडा – उसेगांव येथे दोन पदरी आणि चौपदरी रस्त्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. मागणीची दखल घेत मोठा निधी उपलब्ध करुन दिल्या बद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी ना. नितीन गडकरी यांचे आभार मानले आहे. या कामासह ईतर कामांसाठीही आपण ना. नितील गडकरी यांना निवेदन दिले असुन त्याचा पाठपूरावा आमच्या वतीने सातत्याने सुरु आहे. त्या ही कामांसाठी ना. नितीन गडकरी मोठा निधी उपलब्ध करुन देतील असा विश्वास यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला आहे. सदर भुमिपूजन कार्यक्रमाला मुन्ना लोडे, प्रेम गंगाधरे ,राजू नातर ,राजू सूर्यवंशी ,सादिक शेख ,प्रितम भोंगळे ,नागेश तुरानकर ,सूचित सोडारी, संध्या पाटील ,नितु जैस्वाल ,उषा आगदारी, स्मिता कांबळे ,तिरुमला मातंगि, शालिनी नंद, मंजुळा मंडळ ,रोशन पचारे ,पवन आगदारी, लखन हिकरे,संध्या ठमके , सुनीता कोटावार .कामिनी देशकर यांच्या सह स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here