वरोरा येथे 40 जणांवर हद्दपारीची कारवाई

0
34

वरोरा – 10 दिवसीय सार्वजनिक गणेशोत्सव चंद्रपूर जिल्ह्यात उत्साहात साजरा केल्यावर 9 सप्टेंबरला मोठ्या जल्लोषात भाविक बाप्पाला निरोप देणार आहे . श्री गणेश विसर्जनात कसलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी वरोरा पोलिसांनी 8 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर पर्यंत 40 जणांना हद्दपारीची नोटीस बजावली आहे .
वरोरा शहरात गणपतीचे विसर्जन शांततेत पार पडावी यासाठी तालुक्यातील गुंड व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कलम 144 अंतर्गत 40 लोकांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे . सदरचा प्रतिबंधित आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या आदेशावर ही कारवाई करण्यात आली आहे . Ganesh Visarjan तसेच गुन्हेगारी व शांतता भंग करणारे यांचेवर कलम 107 , 116 ( 3 ) अनव्ये प्रतिवृत्त पाठविण्यात आले आहे .13 लोकांकडून चांगल्या वागणुकीचे अंतिम बंधपत्र घेण्यात आले आहे , तसेच विसर्जन दरम्यान कुठलाही दखलपात्र / अदखलपात्र गुन्हा करू नये म्हणून कलम 149 सीआरपीसी प्रमाणे 113 इसमाना शांतता राखण्यासाठी नोटीस बजावण्यात आले आहे .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here