विधी अभ्यासक्रमातील विद्यार्थांची हिवाळी परीक्षा बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने घ्या – आ. किशोर जोरगेवार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदनाच्या माध्यमातून मागणी

0
27

कोरोना काळात गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत विविध अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने शिक्षण देण्यात आले. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात येताच लेखी सविस्तर स्वरुपात परिक्षा घेण्यात येत आहे. त्यामुळे याचा परिणाम निकालावर जाणवत असुन बहुतांश विद्यार्थी अनुत्तीण होत आहे. ही बाब लक्षात घेता विधी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची परिक्षा ऑनलाईन किव्हा ऑफलाईन मात्र  बहुपर्यायी प्रश्न प्रणालीने घेण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांना केली आहे.
गोंडवाना विद्यापीठाने कोविड साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर मागील २ वर्षात विविध अभ्यासक्रमातील परीक्षा ह्या ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्न स्वरूपात घेतल्या होत्या. परंतु आता कोविड महामारीचा प्रादुर्भाव ओसरत असल्याने विद्यापीठाने परीक्षा या ऑफलाईन लेखी सविस्तर स्वरूपात घेतल्या आहे. त्यामुळे उन्हाळी परीक्षा २०२२ मध्ये विविध अभ्यासक्रमातील बहुतांश विद्यार्थी हे परिक्षामध्ये अनुत्तीर्ण झाले आहे.
विद्यार्थ्यांनी मागील २ वर्षात परीक्षा ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्न स्वरूपात दिल्याने त्यांचा अभ्यास आणि परीक्षेचा सराव त्याच पध्दतीने झाला आहे. त्यातच त्यांचा दैनंदिन लेखनाचा सराव नसल्याने परिक्षेदरम्यान अडचण येत आहे. या सर्व बाबींचा विचार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद द्वारा परीक्षा ह्या बहुपर्यायी प्रश्न स्वरूपात घेण्याचा निर्णय घेतला आहे.
याच धर्तीवर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत विधी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्याच्या भवितव्याचा विचार करून सर्व वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन किंवा ऑनलाईन पंरतु बहुपर्यायी प्रश्न परीक्षा पद्धतीने घ्याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांना केली होती. त्यांनी सदर मागणी राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या लक्षात आणुन दिली असुन सदर मागणी पुर्ण करण्यात यावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातुन त्यांना केली आहे.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here