*चंद्रपुरात विद्यार्थिनींने मारली दुसऱ्या मजल्यावरून उडी*

0
47

चंद्रपूर-जिल्ह्यातील प्रसिद्ध सोमय्या पॉलिटेक्निक विद्यालयात आज 17 सप्टेंबरला पॉलिटेक्निक च्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून विद्यार्थिनींने उडी मारली . अचानक झालेल्या या घटनेमुळे विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी धास्तावून गेले .
त्या विद्यार्थिनीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र गंभीर अवस्थेत असणाऱ्या विद्यार्थिनीला नागपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले . सध्या मुलीची प्रकृती चिंताजनक आहे . मात्र सोमय्या महाविद्यालय व्यवस्थापक मंडळाने सदर प्रकरणाची वाच्यता कुठे होऊ नये याची पूर्ण खबरदारी घेतली . पोलिसांना सुद्धा याबाबत काहीच सूचना दिली नाही . 17 सप्टेंबरला मॅकरून स्टुडन्ट अकॅडमी मध्ये पॉलिटेक्निक चा अभ्यासक्रमात शिकणाऱ्या मुलीला बाहेर जायचे होते , याबाबत त्या मुलीने सोमय्या पॉलिटेक्निक चे प्राचार्य जमिल शेख यांना कळविले मात्र त्यांनी मुलीच्या वडिलांना याबाबत सूचना दिली तर त्यांनी मी महाविद्यालयात येणार तोपर्यंत मुलीला जाऊ देऊ नका असे सांगितले . बाहेर का जाऊ दिले नाही म्हणून रागात ती मुलगी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर जात उडी घेतली . यामध्ये मुलीला गंभीर जखमा झाल्याने तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले . शिवसेना पदाधिकाऱ्यांना या घटनेबाबत माहिती मिळाली असता त्यांनी तात्काळ सोमय्या पॉलिटेक्निक गाठत विचारणा केली , मात्र प्राचार्य • जमिल शेख यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली , शिवसेना व युवासेना पदाधिकाऱ्यांनी प्राचार्य शेख ला चांगलाच चोप दिला . शिवसेनेने प्राचार्य शेख ला चोप दिला असल्याची माहिती रामनगर पोलीस स्टेशनला मिळाली , त्यांनी तात्काळ सोमय्या पॉलिटेक्निक गाठत परिस्थिती नियंत्रणात आणली . याबाबत संस्थेचे चेअरमन पांडुरंग आंबटकर यांचेशी सम्पर्क साधला असता त्यांनी सदर प्रकाराची पूर्ण माहिती घेतली आहे . मुलीच्या उपचार सध्या आमच्या देखरेख मध्ये सुरू असून तिची संपूर्ण काळजी घेतल्या जात आहे .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

Sampadak Shashi Thakkar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here