चंद्रपुरात मुलं पळविणारी टोळी ? चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली महत्वाची माहिती

0
62

चंद्रपूर – राज्यात सध्या मुलांना पळविणाऱ्या टोळी बद्दल चर्चा सुरू आहे , या अफवेमुळे अनेकांनी नाहक मार ही खाल्ला आहे . मात्र मुलांना पळविणारे एकही प्रकरण घडले नाही , परंतु समाजमाध्यमांतुन नागरिक टोळी आली आहे , सतर्क रहा असा मॅसेज सर्वत्र पसरवीत आहे . यामुळे अनेक गावात फिरून कपडे विकणारे , साधू अश्यांचे फिरणे ही कठीण झाले असून यावर आता पोलिसांनी कठोर पाऊले उचलायला सुरुवात केली आहे . खोटा मॅसेज पसरविणार तर त्यांच्यावर कारवाईचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे . चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करीत , कोणत्याही अफवेला बळी न पडण्याची विनंती केली आहे . असे प्रकरण अद्याप जिल्ह्यात घडले नाही , जर असं काही घडत असेल तर नागरिकांनी तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी . चंद्रपूर पोलीस लगेच कारवाईसाठी तत्पर असेल , पण खोट्या माहिती पसरवू नका असे आवाहन अरविंद साळवे यांनी यावेळी केले .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here