साहित्य आचार – विचारांच्या देवाणघेवाणीचे उत्तम माध्यम – आ. किशोर जोरगेवार

0
48

सुर्यांश साहित्य व सांस्कृतीक मंच च्या वतीने तिस-या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन

आजचे मानवी जिवन व्यस्त झाले आहे. अशात समाज उपयोगी असलेली आचार – विचारांची देवाण घेवाण हवी तशी होताना दिसत नाही. ज्या सहित्यांनी समाजाचे प्रबोधन केले असे साहित्य समाजापूढे सातत्याने आले पाहिजे. साहित्य आचार विचारांच्या देवाणघेवाणीचे उत्तम माध्यम असून साहित्य संमेलनाच्या माध्यमातुन ते लोकांपुढे पोहोचले पाहिजे असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या सहयोगाने सुर्यांश साहित्य व सांस्कृतीक मंच चंद्रपूर यांच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या कर्मवीर कन्नमवार सभागृहात 3 रे राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात प्रमुख अतिथी म्हणुन आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. यावेळी इंद्रजीत भालेराव, किर्तीवर्धन दिक्षित, इरफान शेख, संजय वैद्य, श्याम माहेरकर, प्रा. श्याम हेडाऊ, देवानंद साखरकर यांच्यासह इतर मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, कोणत्याही शहराची ओळख ही तेथील साहित्य व संस्कृती ने होत असते. यादृष्टिकोनातून चंद्रपूर हे समृद्ध अस शहर असून या शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक संस्थांनी चंद्रपूर ची गौरवशाली ओळख निर्माण केली आहे.

साहित्यामधून आचार विचारांची देवाणघेवाण होत असते. ही देवाणघेवाण महत्त्वाचीही आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ही साहित्यिक चळवळ नेहमी अशीच कायम रहावी यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. कोणतीही संस्था साहित्य संमेलन घेत असेल तर त्या संस्थेला सात लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देऊ असे यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला साहित्य प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here