शहीद स्वातंत्र्यवीर बाबुराव पुलेसूर शेडमाके राजगोंड सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन
आदिवासी समाज हा चंद्रपूर जिल्हाचा गौरव आहे. या समाजाने देशासाठी दिलेले योगदान अमुल्य आहे. आज शहिद स्वातंत्र्यवीर बाबुराव पुलेसूर शेडमाके राजगोंड सामाजिक सभृहाच्या बांधकामाची सुरवात होत असल्याचा आनंद आहे. तयार होत असलेले हे सामाजिक भवन समाजाच्या सक्षमीकरणाचे, पारंपरिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांसह क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांचा गौरवशाली इतिहास समाजापर्यंत पोहचविणारे केंद्र ठरेल असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.
25 लक्ष रुपयांच्या स्थानिक आमदार निधीतून मुल रोड येथील श्रध्दा सुमन अर्पण स्थळ येथे मंजुर शहीद स्वातंत्र्यवीर बाबुराव पुलेसुर शेडमाके राजगोंड सामाजिक सभृहाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला विरेंद्रशाहा आश्राम, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाॅ, फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष शांताराम उईके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजयसिंह मडावी, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष बापुजी मडावी, गांेडियन सामाजिक सहाय्यता कल्यान संस्थचे अध्यक्ष सुधाकर कन्नाके, उर्जानगर ग्रामपंचायत सदस्या मिनिषा इरपाते, सेवानिवृत्त ठाणेदार बी. डी. मडावी, यंग चांदा ब्रिगेड आदिवासी समाजाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, शहर संघटक विश्वजीत शाहा, राशिद हुसेन, विलास वनकर, तापोष डे आदिंची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, समाजाच्या एकत्रीकरणेसह, सक्षमीकरणासाठी समाज भवनांची गरज आहे. त्यामूळे गाव तेथे समाजभवन हा संकल्प आपण घेतला आहे. दोन आठवड्या पुर्वीच आपण इंदिरा नगर येथील राधाकृष्ण मंदिराच्या खुल्या जागेवर मंजुर समाज भवनाचे भुमिपूजन केले. बंगाली कॅम्प ते संजय नगर हा भाग दुरर्लक्षीत राहिला आहे. त्यामुळे या भागाच्या विकास कामांवर माझे विशेष लक्ष असल्याचे ते यावेळी म्हणाले. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही आदिवासी समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. मतदार संघातील उसगाव आणि शेणगाव येथेही आपण आदिवासी समाजासाठी समाज भवनाला निधी उपलब्ध करुन दिला आहे. यातील एका कामाचे भूमिपूजन संपन्न झाले आहे तर एक काम मंजुरीसाठी प्रस्तावीत असल्याचे ते म्हणाले. समाजाने त्यांच्या अडचणी माझ्या प्रयत्न पोहचवाव्यात त्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
आपण माता महाकाली महोत्सवादरम्यान शहरातुन निघालेल्या माता महाकाली पालखी नगर प्रदक्षिणा शोभायात्रेत आदिवासी समाजाच्या गोंडी नृत्याचा समावेश केला होता. राणी हिराईची झाकीचाही यात समावेश करण्यात आला होता. एंकदरीत पाहता आदिवासी समाजाचे पारंपारीक नृत्य, वेशभुषा आणि त्यांचा गौरवशाली इतिहास राज्यात पोहचविण्याचा हा प्रयत्न होता. समाजानेही त्यांची भाषा आणि पंरपरा जपली पाहिजे असे ते यावेळी म्हणाले. तयार होत असलेले हे सामाजिक भवन समाजाच्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी उपयुक्त ठरणार आहे. यातुन समाजाला त्यांच्या हक्काचे मंच उपलब्ध होणार आहे. याचा उपयोग समाजाने समाजाच्या प्रबोधनासाठी, सक्षमीकरणासाठी, समाजातील थोर क्रातिकां-र्यांचा इतिहास युवा पिढी पर्यंत पोहचविण्यासाठी करावा असे आवाहणही यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. भुमिपूजन स्थळी आमदार किशोर जोरगेवार यांचे आगमन होताच समाज बांधवांनी गांेडी नृत्य सादर करत आ. जोरगेवार यांचे स्वागत केले. त्यानंतर विधीवत रित्या सदर कामाचे भुमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सोमाजी काटलाम, निहालसिंह कुळसंगे, गोपाळराव मसराम, माणिक सोयाम, राम मडावी यांच्यासह समाज बांधव आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793