खेमजई येथे बाबा कर्तबशहा वली समितीच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न श्रमदानातून तयार केलेल्या रस्त्याची आमदार धानोरकर यांच्याकडून दखल

0
55

वरोरा तालुक्यातील खेमजई येथे बाबा कर्तबशाह वली समितीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा जिल्हा परिषदचे माजी सभापती कन्हैयालाल जयस्वाल यांचे वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला.
समरभाचे उद्घाटन वरोरा भद्रावती क्षेत्राच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते पार पडले.समारंभाचे अध्यक्षस्थानी डॉ. प्रमोद गंपावार होते तर याप्रसंगी मंचावर सरपंच मनीषा चौधरी, वरोरा नगर परिषदचे माजी सभापती छोटूभाई शेख, माजी सभापती कन्हैयालाल जयस्वाल, बंडू डाखरे,अरुण बरडे, वसंत निखाडे, रमेश बावणे, ईश्वर टापरे ,अरुण चौधरी,अशोक सोनटक्के इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकातून समिती अध्यक्ष रमेश चौधरी यांनी खेमजई गावाचे हद्दीत असलेले जंगलातील टेकडीवर बाबा कर्तबशहा वली हे ठिकाण दुर्लक्षित होते त्या ठिकाणी जाण्या येण्याचा मार्ग व इतर सुविधा कशा तयार झाले आहे याबाबत सांगितले. कार्यक्रमात समितीचे वतीने आमदार प्रतिभाताई धानोरकर,कन्हैयालाल जयस्वाल , आर एफ ओ मधुकर राठोड, स्नेहल नसरी हिंगणघाट चे दिगंबर खांडरे , अभियंता हेमंत कुलकर्णी, धनपाल चौधरी, रहेमत बाबा, राजू गजभे इत्यादींचा शाल व श्रीफळ देऊन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कन्हैयालाल जयस्वाल यांचा ६२ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी बोलताना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी खेमजई गावात ग्राम पंचायत, गुरुदेव सेवा मंडळ व समितीचे माध्यमातून सातत्याने सुरू असलेल्या ग्राम विकासाचे तसेच जिल्हा परिषद शाळेचे कौतुक केले. समितीच्या पुढाकाराने दुर्लक्षित असलेल्या बाबा कर्तव्यशहा टेकडी पर्यंत जाण्याचा दीड किलोमीटर रस्ता महिला बचत गट व गावकऱ्यांनी श्रमदानातून तयार केला या कामाची दखल घेत आमदार निधीतून रस्ता, वॉल कंपाउंड व शेड इत्यादी कामासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे जाहीर केले. कन्हैयालाल जयस्वाल यांनी आपल्या भाषणात समितीने केलेल्या सत्काराला उत्तर देताना समिती व गावकऱ्यांनी केलेला सत्कार जीवनातील अविस्मरणीय प्रसंग असून गावाच्या विकासासाठी यथोचित योगदान दिले जाईल असे विचार वक्त केले. छोटूभाई शेख यांनी विचार व्यक्त करताना खेमजई गावांनी सर्व धर्माप्रती समभाव दाखवून इतरासाठी आदर्श निर्माण केला असे सांगितले. बंडू डाखरे यांनी आपल्या भाषणात गावकऱ्यांनी हाती घेतलेल्या कामाला दहा हजार रुपयाची आर्थिक मदत जाहीर केली. सरपंच मनीषा चौधरी,अरुण बरडे इत्यादीचे भाषणे झाली.
अध्यापक ईश्वर टापरे यांनी पाणी नको झरू देवू मायबापाच्या डोळ्यात ही स्वलिखित कविता सादर करून प्रबोधन केले. राजुरा येथील रहेमत बाबा यांनी आर्केस्ट्रा सादर करून उपस्थिताचे मनोरंजन केले. निसर्ग सानिध्यात उपस्थितांनी संगीताचा मनमुराद आनंद घेतला. कार्यक्रमाला खेमजई,पोहा,भटाळा इत्यादी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपसरपंच चंद्रहास मोरे यांनी गावकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित संजू जांभुळे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी समितीचे सर्व सदस्य व गावकरी यांनी परिश्रम घेतले.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here