*नळ आहे पण पाणी नाही या विषयाला घेऊन चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे म न पा विरुद्ध निषेध आंदोलन*

0
39

कोट्यावधी रुपयांची अमृतजल योजना असून त्यांचा कामाचा कालावधी समाप्त होऊन सुद्धा आता पर्यंत बाबूपेठ,प्रभागातील बाबा नगर आणि गौरी तलाव परिसरातील जनतेला आता पर्यंत पाणी मिळाले नाही
आणि तेथील स्थानिक जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागते
या ज्वलनशील विषयाला घेऊन आज चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक विनोद लभाने आणि महिला कार्याध्यक्ष चारुशिला बारसागडे यांच्या नेतृवात चंद्रपूर मनपा समोर आंदोलन करण्यात आले
ह्या वेळेस मनपा विरोधात उपस्थित पदाधिकारी व जनतेनी म न पा विरोधात नारे लावून आक्रोश व्यक्त करण्यात आला
सदर आंदोलन करते वेळी शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड,युवक प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर्, ओ बी सी जिल्हाध्यक्ष डी के आरिकर साहेब ,विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, युवक अध्यक्ष अभिनव देशपांडे, युवक विधानसभा अध्यक्ष आकाश निरंटवाट, शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे, महासचिव संभाजी खेवले, सतीश मांडवकर,केतन जोरगेवार,प्रभाग अध्यक्ष शुभांगी बहादूरे,नम्रता रायपुरे, महानंदा वाळके,प्रीती लभाने, कुसुम कटवले, शकुंतला,नक्षीने, भोयर ताई,धीरज बागसरे, प्रीतम दुर्गे,विपील लभाने, सुनील भाईसरे,तसेच बाबूपेठ परिसरातील असंख्य महिला व पुरुष उपस्थित होते.
आंदोलन झाल्या नंतर चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्ठ मंडळनी चंद्रपूर म न पा आयुक्तांना निवेदन देण्यात आले आणि सविस्तर चर्चा करण्यात आली
त्या नंतर आयुक्त साहेबांनी सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून येणाऱ्या 30 तारखे पर्यंत बाबा नगर आणि गौरी तलाव परिसरात नागरिकांना पानी देण्याचे लेखी आश्वासन दिले
आश्वासनाची पूर्तता 30 तारखे पर्यंत न झाल्यास यापेक्षा ही उग्र आंदोलन घेऊ असा इशारा विनोद लभाने आणि महिला कार्याध्यक्ष चारुशीला बारसागडे यांनी दिला.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here