भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष व भगवान बिरसा मुंडा जयंतीचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी,अनुसूचित जमाती मोर्चा महानगर तर्फे ‘बिरसा युवा महोत्सव 2022″चे आयोजन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात गांधी चौक येथे मंगळवार 15 नोव्हेंबरला करण्यात आले आहे.यावेळी उद्घाटक म्हणून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची तर अध्यक्ष म्हणून माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर,प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष(ग्रा)देवराव भोंगळे,शहर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे,आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष धनराज कोवे यांची उपस्थिती राहणार आहे.यावेळी राष्ट्रीय जनजाती गौरव दिन साजरा करण्यात येणार भगवान बिरसा मुंडा यांच्या १४७ व्या जयंती निमित्य हे दुपारी 12 ते रात्री 9 वा.पर्यंतआयोजन होत असून यावेळी जनजाती क्रांतिवीरांची चित्रप्रदर्शनी व आदिवासी पारंपारीक गोंडीनृत्य कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.निर्माता दिग्दर्शक अनिरुध्द वनकर हे ‘क्रांतिसूर्य धरतीआबा बिरसा मुंडा ‘ नाट्य प्रयोग सादर करणार आहेत.यावेळी माजी नगरसेविका चंद्रकला सोयाम, शितल कुळमेथे, ज्योती गेडाम,माया उइके
शुभम गेडाम, रंजना क नांके,गिता गेडाम, तृष्णा गेडाम यांची देखील उपस्थिती राहणार आहे.यशस्वीतेसाठी.भाजपा आदिवासी मोर्चाचे किशोर आत्राम,यशवंत सिडाम, विक्की मेश्राम,
अरविंद मडावी, रेखा मडावी, रविंद्र तुमराम,जगदिश वलके निलिमा आत्राम, सिमा मडावी, अनिता पुसाम, प्रिती दडमल, योगेश आलाम, सुरज सोयाम,
अमोल चौधरी,सपना सोयाम, मोनिका मडावी, अमित गेडाम, रोहीत मडावी, जयश्री आत्राम, सचिन मरस्कोल्हे, प्रविण गेडाम, सचिन आत्राम, आशुतोष आत्राम, बंटी गेडाम, निशा राजगडकर परिश्रम घेत आहेत.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793