के.जी. एन. पब्लिक स्कूल अन्ड ज्युनिअर काॅलेज, बल्लारपूर येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक श्री. शेख महेमूद सर , अध्यक्ष श्री. गुलाम फरिद सर तसेच मुख्याध्यापिका सौ. स्वाती वाघमारे मॅडम उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात केली.
शाळेचे संस्थापक श्री. शेख महेमूद सर यांनी मुलांना संविधान दिवसाबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संविधान बद्दल भाषण, गित, नृत्य, नाटक तसेच वेशभूषा सादर केले. या कार्यक्रमाचे संचालन शाळेतील विद्यार्थ्यीनी कु. स्वर्णलक्ष्मी चौबे हिने केले तर आभार प्रदर्शन कु.साची मुन हिने केले.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793























