आम आदमी पार्टी बल्लारपूर तर्फे एकतेची मशाल महोत्सव साजरा.

0
57

शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार व शहर निवडणूक प्रभारी प्रा. नागेश्वर गंडलेवार यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दिनांक 26/11/2022 रोजी संविधान व पक्ष स्थापना दिनानिमित्त सर्व धर्माच्या गुरूंनी एकतेची मशाल प्रज्वलित करून बाईक रॅलीने मोहोत्सव साजरा करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढण्यात आली, विद्यार्थ्यांसाठी संविधान कलमांची स्पर्धा ठेवण्यात आली व प्रदर्शनी लावण्यात आली व बक्षिसेही देण्यात आली, अनेक विद्यार्थी महापुरुषांच्या वेशभूषेत आले होते, सर्व धर्माच्या धर्मगुरूंना निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते, महाराष्ट्र राज्य संयोजक रंगाभाऊ राचुरे यांच्या अध्यक्षतेत, तसेच विदर्भ संयोजक डॉ.देवेंद्र वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वी झाला.
यावेळी बल्लारपूर, चंद्रपूर, राजुरा, भद्रावती, घुग्गुस, जिवती आदी तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते, बल्लारपूरच्या सर्व क्रांतिकारी कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793P

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here