*योग नृत्य परीवार आझाद गार्डन संघाचा मनपा चंद्रपूर स्वच्छता लीग मध्ये उत्स्फूर्त सहभाग.*

0
77

चंद्रपुर शहर
मागील एक नोव्हेंबर पासून महानगरपालिका प्रशासनाने शहर स्वच्छता व सौंदर्यकरण स्पर्धा आयोजित केली आहे त्यामध्ये योग नृत्य परिवार आझाद गार्डन संघाद्वारे उल्लेखनीय अशी कामगिरी होत आहे.
संघप्रमुख मुद्दा खांडे व योग नृत्य परिवार चे जनक गोपालजी मुंदडा यांच्या नेतृत्वात 63 जणांची टीम तयार झाली आणि या टीमने समाधी वार्ड येथील गोविंद स्वामी मंदिर जेथे घाणीचे साम्राज्य पसरलेल होतं, स्वच्छतेसाठी हाती घेतलं आणि आज तीस दिवसानंतर त्या मंदिराचा पूर्ण कायापालट करून त्याचा एक पर्यटन स्थळ बनवले. प्लास्टिक मुक्ती साठी जनजागृती रॅली काढण्यात आल्या कचऱ्याच वर्गीकरण करण्यासाठी घरोघरी जाऊन उपदेश देण्यात आले झाडे लावा झाडे जगवा अशा अनेक गोष्टींवर संघातील सर्व सदस्यांनी उपक्रम राबवले.
यासोबतच रोज आझाद बगीचा ची स्वच्छता करण्यात आली तसेच अंचलेश्वर बस स्थानक याची अवस्था देखील खूप वाईट होती तेथे देखील या संघा द्वारे स्वच्छता आणि सौंदर्यीकरण करण्यात आले. अंचश्लेश्वर गेट येथे बस कंडक्टरला कापडी पिशव्या देण्यात आल्या, आणि सांगण्यात आले की बस मध्ये बसणाऱ्या प्रवाशांनी कचरा त्या कापडी पिशवीमध्ये टाकायचा आणि त्या पिशव्या डम्पिंग ग्राऊंडला किंवा बस डेपो मध्ये असलेल्या डस्टबिनमध्ये खाली करण्यात येईल …असे नवनवीन बरेच उपक्रम या संघाद्वारे शहर जनजागृती मध्ये राबविण्यात आले.
या उपक्रमात विशेषतः राधिका मुंदडा, मीना निखारे, पूनम पिसे, रंजना मोडक ,मयुरी हेडाऊ, सरीना शेख, अलका गुप्ता, अनिता घोडके, चंद्रशेखर मुनगंटीवार, श्रवण मुंदडा,मनीष आत्राम, बाळकृष्ण माणूसमारे, सुरज घोडमारे, आकाश घोडमारे, रवी निखारे, सुरेश घोडके, विशाल गुप्ता, संतोष पिंपळकर, विनोद कामनवार तरुण खांडे, श्रीप्रकाश पांडे,मोरेश्वर उपलंचीवार यांचा सहभाग मिळाला.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here