चंद्रपूर शहरातील मध्यम वर्गीय कुटुंबात वाढलेल्या निखिल ला बालपणापासून चित्रपट सृष्टीबद्दल आकर्षण होते लहानपणी गोष्टी ऐकणे, वाचणे, चित्रपट बघणे यात तो रमत होता त्याने स्वतःला मोठं होऊन लेखक आणि दिग्दर्शक होण्याचा निर्धार केला. शालेय आणि नंतर महाविद्यालयीन जीवनात असताना निखिलने चित्रपट क्षेत्राबद्दल बरीच माहिती गोळा केली पण प्रत्यक्षात अजूनही त्याच्या चित्रपट कारकीर्दीचा प्रवास सुरू झालेला न्हवता. लेखक आणि दिग्दर्शक होण्याचं स्वप्न उराशी बाळगून असलेल्या निखिल चा पल्याड या चित्रपटामुळे सहायक दिग्दर्शक म्हणून चित्रपट कारकीर्दीचा प्रवास सुरू झाला त्यानंतर नथांबता दुसरा चित्रपट International फालमफोक साठी त्याने सोलापूर गाठले आणि त्यातही सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात चित्रित झालेल्या निबंध या चित्रपटात देखील सहायक दिग्दर्शक हि भूमिका बजावली.
निखिल ने स्वबळावर केलेल्या कार्याला कौतुकाची थाप मिळावी महणुन चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री किशोरभाऊ जोरगेवर यांनी त्याचा सत्कार केला व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. झालेल्या सत्काराबद्दल बोलतांना आयुष्यात नेहमीसाठी जपून ठेवण्यासारखा क्षण अनुभवायला मिळाला असे सांगितले त्याच्या आजवरच्या प्रवासात आई सौ. वंदना सुरेंद्र कडुकर, वडील श्री. सुरेंद्र चंपतराव कडुकर आणि त्याच्या मित्रांचा मोलाचा सहभाग असल्याचे निखिलने सांगितले शेवटी बोलताना भविष्यात लेखक आणि दिग्दर्शक म्हणून चित्रपट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल आणि त्याकरिता तयारी करत असल्याचे सांगितले
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793