खेमजई येथे ग्रामस्थांचे सहभागातून माझा गोठा स्वच्छ गोठा मोहीम यशस्वी

0
85

वरोरा तालुक्यातील खेमजई येथे पशू चिकित्सालयाचे वतीने दिनाक ७/१२/२०२२ रोजी माझा गोठा स्वच्छ गोठा ही मोहीम राबवून पशू पालक व ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली .
कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच मनीषा चौधरी होत्या तर उदघाट्न सहाय्यक आयुक्त डॉ. दिलीप देशमुख ,पशू संवर्धन विभाग चंद्रपूर यांचे हस्ते पार पडले. त्यावेळी प्रामुख्याने उपसरपंच चंद्रहास मोरे, पशुधन अधिकारी डॉ. सतीश अघडते, ग्रा. प. सदस्य रमेश चौधरी, धनराज गायकवाड, भाऊराव दडमल, शैला चवरे, मुख्याध्यापक रामकृष्ण बलकी, पोलीस पाटील विश्वनाथ तुराणकर, शंकर धोत्रे, धनपाल चौधरी, भगवंत नन्नावरे इत्यादी उपस्थित होते.
मोहिमेअंतर्गत गावात प्रभातफेरी काढण्यात आली त्यादरम्यान डॉ अघडते यांनी तयार केलेल्या अभियान गीताचे सादरीकरण शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले. गावात फिरून गोठे निरीक्षण करून लंपी दूत जितेंद्र तेलंग व जीवन लालसरे यांनी जंतूनाशक फवारणी केली.
प्रास्ताविकातून मोहिमेचा उद्देश याबाबत डॉ सतीश अघडते यांनी माहिती दिली. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. दिलीप देशमुख यांनी ट्रेस, ट्रॅक व ट्रीट या त्रिसूत्रीचा वापर करून लंपी चर्मरोग नियंत्रणात आणता येतो याविषयी माहिती दिली.या कार्यक्रमाचे संचालन जि. प. शाळेचे शिक्षक संजू जांभुळे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पशू चिकित्सालय चे पशुधन पर्यवेक्षक विशाल बोरकर, अनिकेत हिवरे, गोपाळ राठोड, बोबडे, नानाजी आत्राम आणि जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक ईश्वर टापरे, चेतना मुन, अनिल वाघमारे,साखरकर ,ग्रामस्थ प्रमोद गायकवाड, हरिदास चौधरी ,सुरेश लभाने, बंडू पारखी यांनी परिश्रम घेतले.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here