आम आदमी पार्टी बल्लारपूर तर्फे ‘एमसीडी’ विजयाचा जल्लोष: नगरपरिषदेवर झेंडा फडकविण्याचा निर्धार!

0
37

08/12 /2022 : गुरूवार – दिल्ली महानगरपालिका म्हणजेच एमसीडी निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. दिल्ली महानगरपालिकेवर मागील सलग 15 वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजपकडून आम आदमी पक्षाने सत्ता खेचून आणली आहे.दिल्ली महानगरपालिकेतील एकूण 250 जागांपैकी आपने 134 जागा जिंकून बहुमताला गवसणी घातली. तसेच गुजरातमध्ये आम आदमी पक्षाने पहिल्याच निवडणूकीत 13% मते घेत मिळविली व याच बरोबर आता आप गुजरातमध्ये एक प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्षही बनला आहे. आपच्या या धमाकेदार विजयाचा जल्लोष बल्लारपूर मध्येही साजरा करण्यात आला. पक्षाचे निवडणूक प्रभारी नागेश्वर गंडलेवार, व दोन्ही उपाध्यक्ष अफझल अली व गणेश सिलगमवार यांच्या नेतृत्वात आम आदमी पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील महानगरपालिकेतील विजयाचा आनंद साजरा केला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे, लाडू भरवत विजयोत्सव साजरा केला. यानंतर शहरात विजयी रॅली काढण्यात आली.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here