स्‍थायी कंत्राटी कामगारांना तात्‍काळ वेतन राशी देण्‍यात यावी फेरो अलॉय प्‍लॉन्‍ट (स्‍टील प्‍लॉन्‍ट) चंद्रपूर येथील स्‍थायी कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन लागू

0
41

फेरो अलॉय प्‍लॉन्‍ट (स्‍टील प्‍लॉन्‍ट) चंद्रपूर ही कंपनी स्‍थायी कंत्राटी कर्मचा-यांना समान काम समान वेतन कायद्यानुसार वेतन देत नसल्‍यामुळे तथा हायकोर्टाच्‍या व उपमुख्‍य श्रमायुक्‍त (केंद्रीय) नागपूर यांच्‍या वेतन देण्‍याच्‍या आदेशाची पायमल्‍ली करीत असल्‍याने स्‍टील प्‍लॉन्‍ट प्रबंधकाकडून न्‍याय मिळवून देण्‍याची मागणी चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍याकडे कामगार संघटनेने केली. त्‍यानुसार श्री. मुनगंटीवार यांनी जिल्‍हाधिकारी चंद्रपूर यांना सुचना देवून बैठक घ्‍यायला लावली व अहवाल सादर करायला सांगीतला. तसेच यासंदर्भात केंद्रीय मंत्र्याशी बैठक लावण्‍याची सुचना दिली.

दिनांक ६ डिसेंबर २०२२ रोजी श्री. मुनगंटीवार यांच्‍या सुचनेनुसार चंद्रपूर जिल्‍हयाचे जिल्‍हाधिकारी विनय गौडा यांनी यासंदर्भात बैठक घेतली. यावेळी भाजपाचे महानगर अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, माजी उपमहापौर राहूल पावडे, चंद्रकला सोयाम, डॉ. येडे, मनोज पोतराजे, सौ. स्‍वाती पारखी, सीएफपी प्रबंधक तर्फे मुख्‍य व्‍यवस्‍थापक कार्मीक व प्रशासन विभाग श्री. विश्‍वनाथा बी. व त्‍यांचे सहाय्यक पिंटू पजाय, सहाय्यक श्रमायुक्‍त केंद्रीय चंद्रपूर देवेंद्रकुमार राम, स्‍थायी कंत्राटी कामगार संघटनेचे कार्याध्‍यक्ष सुर्यकांत चांदेकर, माणिक बटाले, माणिक सोयाम, पुरूषोत्‍तम हूमने, सुधाकर राखडे, विनोद झामरे, महादेव चिकटे, बंडू कुत्‍तरमारे, जगदीश जगलुर, मुसाफिर चव्‍हाण, विजय बहाद्दूर चव्‍हाण, हेमलाल साहू व ३० कामगारांची उपस्थिती होती.

सीएफपी कामगार युनियन नोंदणी क्रमांक एनजीपी-५४५५ ही चंद्रपूर फेरो अलॉय प्‍लॉन्‍ट (स्‍टील प्‍लॉन्‍ट) सेल  मूल रोड चंद्रपूर येथील ३५ वर्षांपासून उद्योगाचे स्‍थायी स्‍वरूपाचे कार्य करणा-या स्‍थायी कंत्राटी कर्मचा-यांची संघटना आहे. या संघटनेने कंपनी व्‍यवस्‍थापनाला समान काम समान वेतन कायद्यानुसार वेतन राशी देण्‍याकरिता नागपूर येथील उपमुख्‍य श्रमआयुक्‍त (केंद्रीय) येथे केस सादर केली असता आयुक्‍तालयाने श्रमीकांच्‍या बाजूने निर्णय दिला, परंतु कंपनी प्रबंधक हायकोर्ट नागपूर येथे गेली असता तिथेही श्रमीकांच्‍या बाजूने निर्णय लागला, परंतु कंपनी वेतन देण्‍याकरिता अंमलबजावणी करीत नसल्‍यामुळे संघटनेच्‍या पदाधिका-यांनी श्री. सुधीर मुनगंटीवार यांचेकडे वेतन मिळवून देण्‍याकरिता विनंती केली. त्‍यानुसार जिल्‍हाधिकारी चंद्रपूर यांनी बैठक घेऊन ३० दिवसाचे आत कायद्याची अंमलबजावणी करून कामगारांना एस-१ ग्रेड वेतन लागू करण्‍यात यावे अशा सुचना दिल्‍या. संघटनेच्‍या वतीने कार्याध्‍यक्ष सुर्यकांत चांदेकर यांनी श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here