आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थिनींना सायकलचे वाटप

0
38

मित्र परिवाराचे आयोजन, 54 गरजु विद्यार्थींना देण्यात आल्या सायकल

 

 

आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार किशोर जोरगेवार मित्र परिवाराच्या वतीने जटपूरा गेट येथे गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते 54 गरजु  विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले.

 

या प्रसंगी सेवा दलाचे सूर्यकांत खनके, योग नृत्य परिवाराच्या राधिका मुंदडा, महाकाली सेवा समितीचे अध्यक्ष अजय जयस्वाल, माजी नगरसेवक बलराम डोडाणी, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटीका वंदना हातगावकर, जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, माता महाकाली महोत्सव समीतीचे प्रभाकर मंत्री, राशेद हुसेन, सवीता दंडारे, सायली येरणे, अमोल शेंडे, करणसिंह बैस, दुर्गा वैरागडे, आशा देशमुख, भाग्यश्री हांडे, आशु फुलझेले, कल्पना शिंदे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

 

आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यंग चांदा ब्रिगेड व विविध सामाजिक संघटणांच्या वतीने सदर आयोजन करण्यात आले होते. दरम्याण सायंकाळी 8 वाजता आमदार किशोर जोरगेवार मित्रपरिवाराच्या वतीने जटपुरा गेट येथे गरजु विद्यार्थीनींसाठी सायकल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  होते. यासाठी विविध शाळांमधुन विद्यार्थिनींचे नावे मागविण्यात आली होती. त्यानंतर सदर विद्यार्थिनींना या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सायकलचे वितरण करण्यात आले.

 

शिक्षण क्षेत्रात भरीव काम करण्याचा संकल्प आपण केला आहे. गरिबीमुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे शिक्षण सुटता कामा नये, अशी आपली भुमिका आहे. गरीब गरजु परिवारातील युवक युवतींनाही उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी आपले प्रयत्न सुरु आहे. मध्यमवर्गीय विद्यार्थी शिकत असलेल्या शिक्षण संस्थांनाही आपण बळकटी देण्याचे काम करत आहोत. अनेक शाळांना सुसज्ज लॅब, संगणक आपल्याकडून उपलब्ध करुन दिल्या जात आहे. तर महागड्या अभ्यासिकांमध्ये अभ्यास करणे न परवडणा-र्या विद्यार्थांसाठी आपण 13 अभ्यासिका तयार करत आहोत. या अभ्यासिकांमध्ये विद्यार्थांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध असणार असुन येथे निशुल्क अभ्यास करता येणार आहे. माझ्या वाढदिवसानिमीत्त आज दिवसभर अनेक सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यात मी कर्तव्य सेतुचे उद्घाटन केले. हे सेतु केंद्रही अनेकांसाठी लाभदायक ठरणार आहे. तर मित्र परिवार तर्फे आयोजित हा कार्यक्रमही कौतुकास्पद आहे. विद्यार्थिनींना सायकल उपलब्ध झाल्याने आता त्यांना बस किंव्हा आटोचे भाडे देण्याची गरज नसल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या उपक्रमा बदल त्यांनी मित्र परिवार गृपचे कौतुकही केले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह विद्याथ्यींनीच्या पालकांचीही उपस्थिती होती.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here