गर्भाशय मुखाचा कर्करोग पूर्णतः बरा होवू शकतो – डॉ. धनंजया सारनाथ

0
31

श्री माता कन्‍यका सेवा संस्‍था चंद्रपूर द्वारा कर्करोग प्रतिबंधक शिबीर संपन्‍न

राज्‍याचे वने, सांस्‍कृतीक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या सुचनेनुसार आयोजित करण्‍यात आलेल्‍या मार्गदर्शन शिबीरादरम्‍यान समाजामध्‍ये योग्‍यरित्‍या जनजागृती व मानवी शरिराची आरोग्‍य विषयक वेळीच काळजी घेतल्‍यास, प्रत्‍येक आजारापासून आपण आपला बचाव करू शकतो. स्‍त्रीयांमध्‍ये वाढत असलेल्‍या कर्करोगावर आजारापूर्वी व प्राथमिक अवस्‍थेत काळजी घेतल्‍यास कर्करोगासारखा दुर्धर आजारही वेळेत बरा होवू शकतो. विशेषतः स्‍त्रीयांमध्‍ये गर्भाशयाच्‍या मुखाचा कर्करोग होण्‍याचे प्रमाण अधिक आहे. त्‍यामुळे भारतामध्‍ये वर्षाकाठी जवळपास दिड ते दोन लाख स्‍त्रीयां मृत्‍युमुखी पडतात. पहिल्‍या व दुस-या स्‍तरामध्‍ये औषधोपचाराने हा आजार पूर्णतः बरा होतो. कर्करोग होवूच नये याकरिता एचपीव्‍ही ही लस ९ ते २० या वयोगटामध्‍ये मुलींनी घेतल्‍यास कर्करोग होत नसल्‍याने संशोधनाने सिध्‍द झाले आहे, असे प्रतिपादन श्री कन्‍यका माता सेवा संस्‍था चंद्रपूर आणि कॅन्‍सर पेशंट ऐड असोसिएशन मुंबई यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित रिसर्च स्‍टडी अॅन्‍ड अॅडीशनल प्रोजेक्‍टर कॅन्‍सर पेशंट ऐड असोसिएशन मुंबईच्‍या कार्यकारी संचालिका डॉ. धनंजया सारनाथ यांनी व्‍यक्‍त केले.

दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी डॉ श्‍यामप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपूर येथे आयोजित गर्भाशयाचा मुखरोग (कर्करोग) या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. धनंजया सारनाथ बोलत होत्‍या. यावेळी भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, पूनम भोवर, अनन्‍या परब, प्रिया प्रसाद, राजेश सुरावार, शैलेंद्रसिंह बैस, भाजपा महानगर महिला आघाडी अध्‍यक्षा सौ. अंजली घोटेकर, डॉ. कल्‍पना गुलवाडे, डॉ. प्रेरणा कोलते, डॉ.किर्ती साने, डॉ. किरण देशपांडे, डॉ. मनीषा घाटे, सागर खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अध्‍यक्ष स्‍थानावरून बोलताना डॉ. मंगेश गुलवाडे म्‍हणाले, सुदृढ व निरोगी शरीर ठेवण्‍याकरिता आजारापूर्वी शरीराची निघा राखणे आवश्‍यक आहे. डॉ. धनंजया सारनाथ यांनी महिलांना वयाच्‍या चाळीसीनंतर सर्वाइकल कॅन्‍सर होवू नये म्‍हणून एचपीव्‍ही लस वयाच्‍या ९ ते २० या वर्षात मुलींनी घेणे आवश्‍यक आहे. ही लस माता श्री कन्‍यका प्रतिष्‍ठानतर्फे पुढील महिन्‍यात दिली जाणार असल्‍याचे त्‍यांनी सांगीतले. या कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेकरिता

सौ. रेणुकाताई दुधे, मायाताई उईके, शिला चव्‍हाण, सुषमा नागोसे, शितल गुरनुले, शितल कुळमेथे, पुष्‍पा उराडे, सचिन कोतपल्‍लीवार, विठ्ठल डुकरे, रवि लोनकर, डॉ. भारती दुधानी, किरण बुटले, जयश्री मोहुर्ले, प्रभा गुडधे, अरूणा बलकी, रेणुका घोडेस्‍वार, पुनम मोडक, संध्‍या मेश्राम, मेघा खडके पाटील, सुषमा लिडर, निर्मला शाम लिडर, रंजना धुर्वे, मोनिषा महातव, पुजा कांबळे, शुभांगी बरडे, सिमा हरकळे, रंजिता येले, तरंन्‍नुम शेख, शितल बोबाटे, सिंधु राजगुरे, कविता मेश्राम, हिना खान, वर्षा सामनकर, वंदना बोरीकर, कल्‍याणी कंचर्लावार, अपेक्षा राजा, रेखा गावंडे, प्राची तेलंग, मयुरी नैताम, दिपाली क्षीरसागर, कोमल धंदरे, हर्षीता मेश्राम, मुस्‍कान शेख, पलक चौधरी, सोनाली बब्‍बर, स्‍वाती तायडे, रूतुजा आगडे, ममता लोहकरे, भाग्‍यश्री भगतकर, मिनल रणदिवे, नुतन मेश्राम, सारिका संदुरकर, शितल इटनकर, अर्चना रामटेके, अमिषा अलोणे, मिना गरडवा, ज्‍योती रामलवार, लिलावती रविदास, रमिता यादव, मुग्‍धा खांडे, पुनम पिसे, रचना सहारे अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ. किरन देशपांडे यांनी केले कार्यक्रमाचे संचालन सौ. ऐश्‍वर्या भालेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी महापौर सौ. अंजली घोटेकर यांनी केले.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here