*वाढदिवसा निमित्त माता महाकाली मंदिरात महाआरती*
माता महाकाली मंदिराच्या सर्व समावेशक विकासासाठी माझे प्रयत्न सुरु आहे. नुकतीच मी पर्यटन व सांस्कृतीक मंत्री यांची दिल्ली येथे भेट घेतली असुन सदर विकासाआड येत असलेल्या पूरातत्व विभागाची अट रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक पडल्यास कायद्यात बदल करण्याचे आश्वासन दिले आहे. या कामासाठी मी प्रयत्नशिल असुन भाविकांना अपेक्षीत असा विकास येथे करणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसा निमित्त माता महाकाली मंदिर येथे महाआरती करण्यात आली. यावेळी माता महाकाली महोत्सव समितीचे अध्यक्ष अजय जैस्वाल, विजय मोगरे, कुक्कु सहानी, बलराम डोडाणी, सुरेश महाकूलकर, सूर्यकांत खनके, दादाजी नंदनवार, मधुसूदन रुंगठा, संजय हरणे, प्रा. श्याम धोपटे, पूनम तिवारी, अशोक तुमराम, स्वरूप मिश्रा, शर्माजी, विलास मसराम, प्रा. श्याम हेडाऊ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी महाआरती नंतर बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, माता महाकाली महोत्सवाच्या माध्यमातून आपण नवी प्रथा सुरु आहे. भाविकांच्या मनात असलेली संकल्पना माता महाकाली महोत्सवाच्या माध्यमातुन सुरु झाली असुन ती नियमित सूरु राहणार आहे. कमी दिवसात झालेल्या या भव्य आयोजनाची राज्याने नोंद घेतली आहे. यात लाभलेला सर्व धर्मीय सामाजिक संस्थांचा सहभाग कौतुकास्पद होता. पूढेही त्यांच्या सहभागी लाभेल अशी अपेक्षा यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी बोलुन दाखविली.
माता महाकाली मंदिराच्या विकासासाठी आपण कटिबध्द आहोत. दुस-या आणि तिस-या टप्यातील विकासकामांसाठी आपण निधीची मागणी राज्यसरकारकडे केली आहे. याबाबत राज्य सरकारही सकारात्मक आहे. मात्र या कामात पूरातत्व विभागाची मोठी अडचण येत आहे. हा केंद्राचा विषय असल्याने आपण दिल्ली येथे पर्यटन व सांस्कृतीक मंत्री जि. किशन रेड्डी यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली आहे. संबधित विभागाच्या सचिवांशीही आपण बैठक घेतली असल्याचे ते म्हणाले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते महाकाली मातेची महाआरती करण्यात आली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793