—————————————-
प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणिक यांनी पदाधिकारी यांच्या समवेत आनंदवनात जाऊन सदाशिवजी ताजने यांना विश्वलक्ष्मी प्रतिष्ठान श्रीरामपूर या संस्थेचा स्वर्गीय अँड रावसाहेब शिंदे स्मृती सामाजिक सेवा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करीत दिल्या शुभेच्छा
————————————–
दिनांक १७ जानेवारी२०२३ ला आनंदवन येथे *विश्वलक्ष्मी प्रतिष्ठान श्रीरामपूर या संस्थेचा *स्व. अँड. रावसाहेब शिंदे स्मृती सामाजिक सेवा पुरस्कार* *श्री. सदाशिव ताजने*
( *विश्वस्त मसेस तथा स्वरानंदवन, प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापक* )यांना
*महारोगी सेवा समितीचे सचिव आदरणीय डॉ. विकासभाऊ आमटे व डॉ.सौ भारतीताई आमटे* यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सदर *पुरस्कार माजी अध्यक्ष, रयत शिक्षण संस्था दिवंगत रावसाहेब शिंदे यांच्या नावाने त्यांचे माजी सचिव तथा या संस्थेचे संस्थापक सचिव श्री. सुखदेव सुकळे,श्रीरामपूर* यांच्यातर्फे देण्यात आला. उमेदीच्या वयाच्या सतराव्या वर्ष विद्यार्थी काळापासून सामाजिक दायित्व बाळगून थेट आनंदवन येथे सलग प्रदीर्घ काळापासून स्वर्गीय बाबा आमटे व साधनाताई आमटे यांच्या सानिध्यात व मार्गदर्शनात आनंदवनातील विविध पदावर सर्व जबाबदाऱ्या सांभाळीत सेवाभावी दृष्टीने काम करणारे एक आगळ वेगळा व्यक्तिमत्व विश्वस्त तथा स्वरानंदनवन प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापक सदाशिव ताजणे यांना
स्वर्गीय अॅड. रावसाहेब शिंदे स्मृती सामाजिक सेवा पुरस्कार आनंदवनात प्रदान केल्याबद्दल सदाशिवजी ताजणे यांचे स्नेहांकित व आनंदवन पारिवारिक मित्र अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख, कलाअकादमी चे संचालक व जनमंच सदस्य रवींद्र तिराणिक यांनी पत्रकार संघ व सामाजिक मंच पदाधिकारी सहित आनंदवनात जाऊन पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. प्रसंगी सदाशिव ताजने यांनी आपुलकी पूर्ण जुन्या आठवणींना उजाळा देत आनंदवनचे विश्वस्त बाबा आमटेंचे स्नेही स्वातंत्र्य सेनानी श्रीधरराव पदमावार काका ते रवींद्र असा प्रवास उलघडला .ग्रामोद्योग संघात”अश्रूंची झाले फुले”नाट्य प्रयोग तसेच भद्रावती मध्ये भद्र नाग मंदिराच्या व्यासपीठावर सर्वप्रथमता आनंदवन येथील अंध मूकबधिर शंभर विद्यार्थ्यांचा आर्केस्ट्रा संपूर्ण आनंदवन ट्रस्ट पदाधिकारी व समाजसेवक डॉक्टर विकास आमटे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. तत्कालीन स्थानिक स्तरावर कुठलेही राजकीय व सामाजिक आर्थिक पाठबळ नसताना सर्व सामान्य मित्रांना सोबत घेऊन पायपीट करीत अंध मूकबधिर विद्यार्थ्यांचे आर्केस्ट्रा चा प्रचार व प्रसार करीत सर्व सामान्यांच्या सहकार्याने आदिवासी हस्तकला व चित्रकला केंद्र व कला अकादमीच्या माध्यमातून भद्रनाग व्यासपीठावर खुल्या प्रांगणात डोळ्यांचे पारणे फिटेल अशा हजारोंच्या उपस्थितीत सादर करण्यात आला .त्यानंतर सलग दोनदा युवा कला महोत्सव कार्यक्रम प्रसंगी पार्श्वनाथ जैन भवन येथे दोनदा आनंदवन ट्रस्टने रवींद्र तिराणिक यांच्या आपुलकी पूर्ण आग्रहाखातर सादर केला . अशी जुनी आपुलकीची आठवण करीत आत्ताचा स्वरानंदनवन आर्केस्ट्रा अशी प्रचिती आजच्या आनंदवनच्या भेटी प्रसंगी दिली . आदरणीय सदाशिवजी ताजने यांनी रवींद्र तिराणिक यांना आपले आपुलकी स्नेहापूर्वक पुस्तक भेट दिले . भेटी प्रसंगी सामाजिक ,कला व साहित्य मंच जिल्हाध्यक्ष दीपक शिव, पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कोहपरे ,सरचिटणीस परमानंद तिराणिक, श्रीपाद बाकरे आदींची उपस्थिती होती –
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793