=======================
एफ. इ.एस.गर्ल्स कॉलेज, चंद्रपूर द्वारा राजुरा तालुक्यातील कढोली (बु)येथील साईनाथ विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जादूटोणाविरोधी कायदा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर चमत्कार भंडाफोड प्रात्यक्षिकांसह व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सचिव धनंजय तावाडे जिल्हा संघटक अनिल दहागावकर यांनी अंधश्रद्धांशी निगडित भूत भानामती तंत्र मंत्र जादूटोणा बुवाबाजी,देवी अंगात येणे, जादूटोणाविरोधी कायदा या विषयांवर चमत्कार भंडाफोड प्रात्यक्षिकांसह गावकरी आणि विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. याप्रसंगी सरपंच राकेश हिंगाने रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.राजेंद्र बारसागडे सह रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.कल्पना कावळे, प्रा.डॉ. कायरकर मॅडम, प्रा.अशोक बनसोड, प्रा.पुरटकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला कढोली गावातील ग्रामस्थ युवक युवती विद्यार्थी तसेच रासेयो च्या स्वयंसेवक विद्यार्थिनींची बहुसंख्येने उपस्थिती होती.
________________________
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
____________________________
संपादक :- शशी ठक्कर 9881277793