* जल संवर्धन काळाची गरज:- संजय वैद्य रासेयो शिबिरात स्वयंसेवकांना जल संवर्धनाविषयी मार्गदर्शन *

0
26

===================≠=======

चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित सर्वोदय शिक्षण मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे शिबिर आयोजित केले आहे. दि. 30 जानेवारीला दुसऱ्या सत्रात जल संवर्धन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख वक्ते संजय वैद्य म्हणाले की, पर्यावरणाच्या रक्षणासाठी अनेक प्रकारचे प्रकल्प सुचवले जातात. कोणीतरी आपल्या गच्चीवर बाग करतो. मात्र, वृक्षांची लागवड व जोपासना करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. दैनंदिन जीवनातील लहान-लहान सवयी बदलल्या तर पर्यावरणास मोठा हातभार लागू शकतो. पाण्याचा काटकसरीने वापर करणे तसेच नद्या व तलावातील प्रदूषण थांबविणे पर्यावरणासाठी हितकारक ठरते. पाण्याचा पुनर्वापर, रेनवॉटर हार्वेस्टिंग, पारंपरिक जलस्त्रोतांचे नूतनीकरण व अन्य अनुषंगिक माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे. जलसंधारणातील एक धोरण म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग. तलाव, कालवे खोदणे, पाणी साठ्याचा विस्तार करणे, आणि पावसाचे पाणी पकडणारे नलिका आणि घरावर गाळण्याची यंत्रणा बसवणे हे पावसाचे पाणी साठवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कापणी केलेले आणि फिल्टर केलेले पावसाचे पाणी शौचालये, घरगुती बागकाम, लॉन सिंचन आणि लहान प्रमाणात शेतीसाठी वापरले जाऊ शकते.
डॉ. निखील देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, जल शुध्दीकरणाच्या नवनवीन तंत्राचा वापर करून पिण्याच्या पाण्याची सर्वाधिक काळजी घेणे. दूषित पाणी शुध्द करून पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणे. दूषित पाण्याची उगमस्थाने तपासून पर्यायी व्यवस्था व नियोजन करणे. जल प्रदूषण कमी करण्यासाठी जनसंपर्क, जागृती व संवर्धनाच्या हेतूने विविध माध्यमांचा प्रभावी वापर करणे.
या सत्राचे अध्यक्ष डॉ. निखील देशमुख, प्रमुख वक्ते  प्रमुख वक्ते संजय वैद्य जिल्हा समन्वयक जलबिरादरी चंद्रपूर, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर गोंड मंचावर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे संचालन प्रांजली बोढाले, आभार पुनम ढोक हिने केली. तर, रा. से. यो विभागीय समन्वयक डॉ. उषा खंडाळे, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. वंदना खनके, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होते.
=======≠==≠=====≠=============
*“हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=============================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here