* मोबाईल व‌ अपुरी झोप मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करते:- डॉ. अविशा मडावी *

0
27

=======================

* रासेयो शिबिरात स्वयंसेवकांना आरोग्याविषयी विषयी माहिती * 
============================
चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित सर्वोदय शिक्षण मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे शिबिर आयोजित केले आहे. दि. 30 जानेवारीला पहिल्या सत्रात.स्व. शांताराम पोटदुखे यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य तपासणी शिबिर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात  गांवकरी आणि शिबीरर्थ्यांची बी. पी., मधुमेह, मलेरिया, थायराईट, सीबीसी ची तपासणी करण्यात आली. तसेच आरोग्याविषयी प्रमुख वक्ते डॉ. अविशा मडावी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. सतिश सिडाम, लहूकुमार सुर्यवंशी, उषा गिरडकर, रेवती मुत्तेलवार, ANM आचल तातकंटिवार प्राथमिक आरोग्य केंद्र विसापूरच्या उपस्थित होते.
प्रमुख वक्ते डॉ. अविशा मडावी म्हणाले मोबाईल ही अशी वस्तू झाली आहे, जिच्याशिवाय आता कोणीच राहू शकत नाही. मोबाईल दिसला नाही की खूप जणांची चिडचिड होऊ लागते. पूर्वी मोबाईल हा फक्त मोठ्या माणसांसाठी कामाची अशी वस्तू होती. पण आता ती अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठीच जीवनावश्यक वस्तू बनून गेली आहे. लहान मुलांच्या हातातही हल्ली मोबाईल फोन दिसू लागला. खूप जणांना फोन नसेल तर झोप लागत नाही. फोन हातात असेल मगच झोपावेसे वाटते. फोनच्या खूप जास्त अधीन गेल्यामुळे एकटेपणा, निद्रानाश, कामात लक्ष न लागणे, पैसे वाया जाणे,  सायबर क्राईमचा धोका, डोळ्यांच्या समस्येचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. आजार पळविण्यासाठी केवळ औषधांच्या गोळ्या, इंजेक्शन घेणे अथवा बाटल्या रिचवणे गरजेजे आहे असे नाही. कारण, कित्येक आजार हे मानवाच्या सवयी आणि बदलत्या जीवनशैलीमुळे जडत आहेत. असे असले तरी यावर उपायही आहेत. उच्च रक्तदाब, हृदयगती वाढणे, हृदयविकार अशा आजारांचे प्रमाण वाढलेले दिसून येते. याचा अर्थ रात्रीची पुरेशी शांत झोप आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असते. निद्रानाश किंवा अपूर्ण झोप हे डिप्रेशनचे एक प्रमुख लक्षण आहे.
या सत्राचे अध्यक्ष डॉ. उषा खंडाळे, प्रमुख वक्ते  डॉ. अविशा मडावी, वैद्यकीय अधिकारी प्राथ. आरोग्य केंद्र विसापूर, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. वंदना खनके मंचावर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे संचालन श्रीधर राठोड, आभार अंकिता खापने हिने केली. तर, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ.कुलदीप आर गोंड, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखील देशमुख, स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होते.
=======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
==========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here