*”देश सर्वोपरि” चा नारा बुलंद करीत विश्वगौरव युगपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलाय अमृतकालीन अर्थसंकल्प* 

0
36

=======================

*ना. सुधीर मुनगंटीवार यांनी in केले सविस्तर विश्लेषण*==

=============================

*नागपूर भाजपच्या वतीने ‘बजट पर चर्चा’*

=============================

नागपूर ; आगामी  २५ वर्षाचा काळ आपण ‘अमृत काळ’ मानला आहे. देशगौरव पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी दीर्घकालीन विचार करून या  २५ वर्षांचा विचार करुन “देश सर्वोपरि” चा नारा बुलंद करत  अमृतकालीन अर्थसंकल्प  भारताला दिला असल्याचे प्रतिपादन  राज्याचे वन, सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी  केले.

भारतीय जनता पार्टी आर्थिक प्रकोष्ठ तर्फे नागपुरात  ‘बजट पर चर्चा’ या कार्यक्रमाचे आयोजन सीताबर्डीतील आशीर्वाद लॉनमध्ये करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर सीए जयंत रानडे व भाजपा महानगर अध्यक्ष,आमदार प्रवीण दटके उपस्थित होते.

पुढे बोलताना ना.मुनगंटीवार म्हणाले, पूर्वी अर्थसंकल्पात काय स्वस्त काय महाग, आपल्याला व आपल्या क्षेत्राला काय मिळाले याचाच विचार होत होता. मात्र, विश्वगौरव श्री.नरेंद्रजी मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशाला काय मिळालं किंवा देता येईल या  बाबतीत विचार होऊ लागला आहे.
मोदी यांनी संशोधन या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. “जय अनुसंधान ” हा नारा बुलंद केल्यानेच देशात आणि देशाबाहेर सुद्धा कोविड ची लस मोठ्या प्रमाणात आपण देऊ शकलो ही खूप मोठी उपलब्धी असून अभिमानाची बाब आहे असे ते म्हणाले.

‘वंदेभारत’ सारख्या गाड्यांचे नियोजन करून प्रवाशांना समाधानाची यात्रा मा.मोदींजीनीं दिली आहे. वर्ष २०११ मध्ये तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री चिदंबरम यांच्या काळात आपण  आर्थिक बाबतीत जगात  १० व्या स्थानावर होतो. मात्र, आता आपण ५ व्या स्थानावर आलो आहे.

मागील सरकारचे ६६ वर्ष ९ महिने ११ दिवस विरुद्ध मोदी सरकारचे ८ वर्षे ८ महिने ९ दिवस या काळाची काय विशेषतः राहिली आहे याचा विचार केला तर मोदींनी देशाला दिलेल्या विविध योजनांमुळे आज केवळ ८ वर्षात भारताने मोठी प्रगती केली असल्याचे ना.मुनगंटीवार म्हणाले. यासह मागील ८ वर्षात केंद्र सरकारने केलेल्या विविध कामांची व योजनांची माहिती देत केंद्र सरकारच्या कामावर, लोकोपयोगी योजनांवर प्रकाश टाकला.

=========================

*८० कोटी लोकांना मोफत धान्य !*

कुणीही उपाशी झोपू नये, म्हणून नरेंद्र मोदींनी कोरोना काळात सव्वा दोन लाख कोटी खर्च करून २८ महिन्यापर्यंत ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिले. सध्या चीनमधील कोरोना रुग्णांची संख्या लाखोंच्या घरात आहे. मात्र, चीन खरा आकडा लपवित आहे. मात्र, भारतात सध्या केवळ १ हजार ३४२ रुग्ण सक्रिय आहेत.

हर घर योजना, आयुष्यमान भारत याच्या यशस्वी वाटचालीची माहिती देऊन ना.मुनगंटीवार यांनी बजेटमध्ये पर्यटनाला मोठे प्रोत्साहन मिळाले असल्याचे सांगितले. तसेच नालेसफाई पासून तर मोठ्या उद्योजकांपर्यंत प्रत्येक व्यक्तीचा यात विचार केला असल्याचेही ते म्हणाले.

मा.जयंत रानडे यांनीही केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर विस्तृत विवेचन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.गिरधारी मंत्री यांनी केले आणि भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी यांनी संचालन तर आभार प्रदर्शन सीए जुल्फेश शाह यांनी केले.

==========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

===========≠============≠====

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here