*आजार मुक्त गावांसाठी पाचगाव ग्राम पंचायत कटिबध्द* *पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी घेतली शपथ ! …*

0
30

========

………………………………….
क्षयरोग व कॅन्सर सारख्या जिवघेण्या आजारांपासून मुक्ती मिळावी, गावात स्वच्छता ठेवून नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि असे आजार पसरू नये यासाठी घ्यावयाची काळजी.शासनाच्या आरोग्य विषयक योजना गावात राबवून नियमांचे पालन करण्यास पाचगाव ग्राम पंचायत प्रशासनाने पुढाकार घेत लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले.ग्रा.प.पदाधिकाऱ्यासह शालेय विद्यार्थी,पालक, शिक्षकवृंद व ग्रामस्थांनी शपथ घेत आजाराला दुर ठेवण्याचा संदेश दिला.

क्षयरोग -कर्करोग हा वृद्धावस्थेत होतो हा समज खोटा ठरत असुन, तरूणांमध्ये आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.एका सर्व्हे क्षणातील निष्कर्षानुसार युवकांच्या जिवन शैलीत होणारे बदल,अतिमध्यप्राशन, धुम्रपान, व्यसनाधीनता, अस्वच्छता, वाईट संगत असल्याचे पुढे आले.अशा भयानक आजारांपासून दूर राहायचे असल्यास प्रदुषण मुक्त राहावे लागेल, त्यासाठी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन करणे काळाची गरज आहे.

क्षयरोगा सारख्या संसर्गजन्य रोगांपासून मुक्ती मिळवायची असल्यास स्वच्छता बाळगणे,हातधुणे,शौचालयाचा नियमित वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे,खोकतांना रूमाला वापर करणे, शिकतांना काळजी घेणे,आजाराची लक्षणे दिसताच वेळीच उपचार व औषौधोपचार घेणे, आजारी रूग्णाला मदत करणे व उपचारासाठी प्रोत्साहन दिल्यास निश्चितच गाव निरोगी राहण्यास मदत होईल.
पाचगाव ग्राम पंचायतीच्या पुढाकाराने आजारांपासून दूर राहण्याचा संदेश देणारी शपथ जि.प.उच्च प्राथ.शाळेच्या मंचावरून देण्यांत आली.शासनाच्या शपथ संदेशाचे वाचन शिक्षक मनोहर बोबडे यांनी केले. शपथ घेतांना उपसरपंच सौ.उज्वला अकबरशाह आत्राम, पाचगाव ग्राम पंचायत सदस्य बापुरावजी मडावी,मनोज कुरवटकर,सौ.कल्पना म. काकडे,सौ.शुभांगी उ. गोनेलवार,सौ.पार्वता वि. तलांडे,ग्रामविकास अधिकारी गणेश राठोड, मुख्याध्यापक अमर पाझारे,माजी.पं.स.सदस्य सौ.सुनंदा दे.डोंगे, प्रतिष्ठित नागरिक शंकरराव गोनेलवार,पो.पा.शंकर खामनकर,शाळा समिती अध्यक्ष सत्यपाल चापले व सदस्य,ग्रा.प. कर्मचारी लक्ष्मण गेडाम,रूपेश गेडेकर,यादव पिदुरकर,रामा आळे,शाळेचे शिक्षक वृंद, आरोग्य कर्मचारी, ग्रामस्थ शपथ घेतांना उपस्थित होते.

==========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=============================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here