* बल्लारपूर नगरपरिषदेची पुनर्बांधणी करण्यापूर्वी शाळांची जमीनी व्यवस्था सुधारा. – रविकुमार पुप्पलवार *

0
48

================

* बल्लारपुर *.        

====================

०७/०२/२०२३ रोजी, आम आदमी पार्टीने मा. जिल्हाधिकारी,आमदार आणि खासदारांना निवेदनाद्वारे नगरपरिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांची जमीनी व्यवस्था सुधारणे, विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक, सांस्कृतिक शिक्षण देने व कार्यक्षम बनवणे, महापालिकेच्या पुनर्बांधणीपूर्वी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. नगरपरिषद आणि अनेक शाळांमध्ये पायाभूत सुविधा निकृष्ट आहेत, स्वच्छतेचा सुगावा नाही, आपल्या बल्लारपूर शहरात नगरपरिषद स्थापन होण्यापूर्वी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळांची गरज आहे, नगरपरिषदेची अवस्था इतकी वाईट नाही की कर्मचार्‍यांना व अधिकार्‍यांना बसणे किंवा काम करणे अवघड होत आहे, काही काळापूर्वी नगरपरिषदेचे सुशोभीकरण, बल्लारपूर शहरात चांगल्या शाळा बांधणे, व्यवस्थेत सुधारणा करणे, आवश्यक सुविधा पुरविणे हे अत्यंत आवश्यक आहे, नागारपरिषद करीता काही काळापूर्वी पैसा खर्च झाला होता. नगरपरिषदेच्या पुनर्बांधणीचे काम ते थांबवून शाळा सुधारण्याकडे लक्ष वेधून बल्लारपूर शहराचे भविष्य उज्वल करण्यासाठी अधिकारी, आमदार, खासदार यांनी आपले योगदान द्यावे. बल्लारपुर शहरातिल नगरपरिषद बनन्या अगोदर प्राथमिक व माध्यमिक शाळा सुंदर आणि उत्कृष्ट बनवा.
शाळांचे आवश्यक विषय :-
1) सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे.
२) शाळांमध्ये कायमस्वरूपी किंवा तात्पुरते शिक्षक नेमावेत.
३) शाळांमध्ये कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करणे आवश्यक आहे.
4) ज्या शाळा मोडकळीस आलेल्या आहेत, त्यांची आधी पुनर्बांधणी करावी.
५) शाळांमध्ये खुर्ची, टेबल, फरशी, लाइट , काळा किंवा हिरवा बोर्ड, शुद्ध पाणी (आरओ वॉटर) चांगले आणि चालू ठेवावे.
६) शाळांच्या आवारात सुशोभीकरण करावे.
७) क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, बुद्धिबळ, कॅरम, क्यूब्स, भाला, गोला व इतर आवश्यक क्रीडा साहित्य शाळांमध्ये उपलब्ध करून द्यावे.
८) शाळांमध्ये ग्रंथालये उपलब्ध करून द्यावीत.
९) शाळांमधील दैनंदिन स्वच्छतेचे प्रथम नियोजन करावे.
10) शाळांमध्ये चांगली स्वच्छतागृहे आणि मुत्रालये उपलब्ध करून द्यावी.
11) दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

बल्लारपूर शहरातील शाळांची व्यवस्था सुधारण्याआधी नगरपरिषदेचे पुनर्बांधणीचे काम होऊ देणार नाही, या प्रश्नाची गांभीर्याने दखल न घेतल्यास आम आदमी पार्टी बल्लारपूर कडून आंदोलन छेडले जाईल व वेळ आली तर ते तीव्र होणार त्याला नगरपरिषद जबाबदार मुख्याधिकारी,अधिकारी, आमदार, खासदार राहील असे आवाहन शहराध्यक्ष रविकुमार शंकर पुप्पलवार जी यांनी केले आहे.
बल्लारपूर शहरात आतापर्यंत 700 कोटींची कामे झाली आहेत, दाखविण्याआधी आपल्या शहरातील मुलांचे भविष्य सुधारण्यासाठी शाळा महत्त्वाची आहे, या संदर्भात शासन व प्रशासनाकडून पूर्ण सहकार्याची अपेक्षा आहे, अशा आशयाचे निवेदन दिले.
यावेळी शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, शहर निवडणूक प्रभारी प्रा. नागेश्वर गंडलेवार, उपाध्यक्ष गणेश सिलगमवार, सचिव ज्योतीताई बाबरे, कोषाध्यक्ष आसिफ शेख, महिला उपाध्यक्षा सलमा सिद्दीकी, युवा अध्यक्ष सागर कांबले , युवा सचिव रोहित जंगमवार, cyss सहप्रमुख आशिष गेडाम, बस्ती विभाग प्रभारी प्रा. प्रशांत वाळके, अफजल अली, राकेश आमटे, इत्यादी उपस्थित होते.

========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

====≠==================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here