* बल्लारपूर नगरपरिषदेच्या शाळांची माहिती देण्यास व शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यात हलगर्जीपणाच्या तक्रार *

0
30

*************************

-आम आदमी पार्टीचे नगरपरिषदचे मुख्याधिकारी मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन. 

***********************

या संदर्भात:-
०१) निवेदन दिनांक :- ०७/०२/२०२३
०२) निवेदन दिनांक :- २०/०२/२०२३
०३) निवेदन दिनांक :- २२/०२/२०२३
०४) निवेदन दिनांक:- २७/०२/२०२३
०५) अधिकाऱ्याशी बैठक दिनांक :- २८/०२/२०२३
०६) निवेदन दिनांक :- ०३/०३/२०२३
०७) अधिकाऱ्यासह शाळेंचा निरीक्षण दौरा दिनांक :- १०/०३/२०२३
०८) निवेदन दिनांक ०३/०४/२०२३
९) अधिकाऱ्यांशी बैठक दिनांक :- १७/०२/२०२३
१०) निवेदन दिनांक :- १८/०४/२०२३

************************
शुक्रवार दिनांक:- 30 जून 2023 रोजी शहराध्यक्ष रविकुमार लता पुप्पलवार यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टी बल्लारपुर तर्फे नगरपरिषद बल्लारपूर अंतर्गत येणाऱ्या विद्यालयामध्ये सुधारणा व्हावे या अनुषंगाने पुन्हा एकदा निवेदन देण्यात आले आहे, सतत निवेदन, अधिकाऱ्यांशी बैठक व शाळेच्या निरक्षणाच्या माध्यमातून शाळेतील सोय-सुविधा, शालेय व्यवस्थापन, शैक्षणिक स्तर सुधारणा, विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध करण्याकरिता प्रयत्न व्हावे अशी आम आदमी पार्टी बल्लारपुरात नेहमीच मागणी करित आहे, या संदर्भात नगरपरिषदे द्वारे केल्या जाणाऱ्या उपाययोजनां बाबत,
१) शाळा व्यवस्थापन समितीची लिखित स्वरूपात माहिती देण्यात यावे.
२) पटसंख्या वाढविण्याबाबत उपाययोजनेची लिखित स्वरूपात माहिती देण्यात यावे.
३) शैक्षणिक साहित्य व क्रीड़ा साहित्य उपलब्ध करुन देने संदर्भात लिखित माहिती देण्यात यावे.
४) इंग्रजी बालवाड़ी संमधित संपूर्ण लिखित स्वरूपात माहिती देण्यात यावे.
५) “नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या १३ प्राथमिक शाळेत एकूण ५२ वर्ग आहेत आणि १ (अ व ब ) माध्यमिक शाळेत एकूण १० वर्ग असून वर्गनिहाय शिक्षक व वर्गखोल्या उपलब्ध करून द्याव्या अश्या मागण्या आहे, वरिल संदर्भ नमूद असलेली शाळेची माहिती पुरविण्यास नगरपरिषद हलगर्जीपणा करत आहे, अशी तक्रार जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे, या विषयावर आवर्जुन लक्ष देण्यात यावे व मागणीची पूर्तता करून हि माहिती लवकरात लवकर उपलब्ध करून शिक्षण व्यवस्था सुधारनेकडे लक्ष केंद्रित करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा संघठन मंत्री- प्रा. नागेश्वर गंडलेवार, शहराध्यक्ष- रविकुमार पुप्पलवार, शहर उपाध्यक्ष- गणेश सिलगमवार, अफज़ल अली, प्रा. प्रशांत वाळके, सचिव- ज्योतिताई बाबरे, प्रवक्ता- आसिफ शेख, महिला अध्यक्षा- किरण खन्ना, विधि सल्लागार- एड.सुमित आमटे, सुदाकर गेडाम, सतीश श्रीवास्तव, स्मिता लोहकरे, नलिनी जाधव, जमीला शेख आणि इत्यादि उपस्थिति होते .

*******************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

********************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here