ठराविक दुकानांमधूनच शालेय गणवेश खरेदीची सक्ती का?

0
44

*********************

* Nilesh Thakre * 

************************

पालकांचा सवाल : शाळा- दुकानदारांमध्ये ‘टायअप’ तर नाही ना?  

**********************
आता शालेय शिक्षणातही कट प्रैक्टिसचा धंदा जोरात सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून शाळांनी काढलेल्या परिपत्रकानुसार ठराविक दुकानातूनच पालकांना गणवेश, वह्या- पुस्तकें अन् इतर शालेय साहित्यांची खरेदी करावी लागत आहे. अशाप्रकारे सक्ती केली जात असल्याने दुकानदारही मार्केटपेक्षा अधिक दराने शालेय साहित्याची विक्री करत आहेत. यासाठी शाळांना दुकानदारांकडून १० ते २० टक्के कमिशन मिळत असल्याचे सांगितले जात आहे.

**********************

त्रस्त पालक म्हणतात…. 

*******************

पाचवीसाठी मुलीचा प्रवेश घेतला. त्यावेळी शाळेतूनच एका मोठ्या कपड्यांच्या दुकानाचा पत्ता असलेले पत्रक देत तेथून कपडे घ्या, असे सांगितले गेले. त्या दुकानात एकतर प्रचंड गर्दी होती अन कपड्यांचे दर देखील अधिक होते. इतर दुकानांमध्ये हे कपडे मिळत नसल्याने कितीही महाग असले तरी तेथूनच कपडे घेणे भाग पडते. हे कपडे व्यावसायिकांना माहीत असल्याने त्याचीही मुजोरी वाढली आहे. शाळा, दुकानदार यांच्यात मिली भगत आहे. त्यामुळे आर्थिक शोषण होत आहे.

**************************

शाळांनी शिक्षणाचा खुलेआम मांडलेला हा बाजार पालकांच्या मुळावर उठला असून, पालकांची मोठ्या प्रमाणावर लूट सुरू आहे. ज्ञानदानाचे काम करणाऱ्या खासगी आहेत. शाळाचे या दुकानदारांच्या ‘दलाल’ बनल्याने दाद कुणाकडे मागायची? असा प्रश्न पालकांना पडला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात शासन मूग गिळून गप्प बसले आहे. शासनाचे ना खासगी शाळांच्या प्रवेश शुल्कावर नियंत्रण, ना मनमानी कारभारांवर, शिक्षणसम्राटांच्या शाळांमध्येही हीच स्थिती असल्याने ‘दिव्याखाली अंधार’ असेच म्हणावे लागेल,

**********************

मग वस्तुस्थिती काय? 

*********************

खासगी शाळांच्या निकाला दिवशीच कोणत्या दुकानातून गणवेश घ्यावा. याची माहिती पालकांना दिली जाते. या शाळांशी टायअप असलेली काही ठराविक दुकाना साेबत साटेलोटे असल्याची चर्चा पालकात हाेत आहे.

******************************

पावसाळ्यात मुलांसाठी दोन गणवेश घेणे भाग पडते यातच पीटीचा, व गुरवार किंवा शनिवारला लागणारा गणवेशदेखील घ्यावा लागतो. गणवेशासह शालेय साहित्याची खरेदीही सहा ते सात हजारांच्या घरात जाते. त्याच्याबरोबरच शाळांचे भरमसाठ शुल्क आहेच त्यात गणवेश घेणे परवडत नसेल तर मग मुलाला आमच्या शाळेतून काढून सरकारी शाळेत घाला, असे सांगितले जात आहे. मुलाला तर शाळेतून काढता येणे शक्य नाही. त्यामुळे मूग गिळून बुक्क्यांचा मार पालकांना सहन करावा लागतो.

**************************

ठराविक दुकानांमधूनच गणवेश खरेदी करण्याची सक्ती का केली जाते तेच कळत नाही. एकतर शाळांचे भरमसाठ शुल्क, त्यातच शालेय साहित्य खरेदी अधिक दराने करण्याचा बोजा पालकांवर लादला जात आहे. बाहेरच्या दुकानांमध्ये गणवेशाचे कापड स्वस्त दरात उपलब्ध असतानाही विनाकारण पालकांना चढ्या दराने खरेदी करण्यास भाग पाडले जाते. यातव गणवेशाच्या साइजमध्ये फरक असतो. कधी मोजे उपलब्ध नसतात, तर कधी शूज मापाचे मिळत नाहीत. एका दुकानदाराच्या मक्तेदारीमुळे पालकांचे शोषण होत आहे.

****************************

गेल्या काही वर्षांपासून खासगी शाळांनी स्वतःचे स्वतंत्र शैक्षणिक धोरणच राबवणे सुरु केले आहे. शहरात एप्रिल ते जुलै या कालावधीत शुल्क, स्टेशनरी, गणवेश आणि स्कूल बससह इतर शालेय खर्च अशी मिळून कोटीच्या घरात उलाढाल होत असल्याचा अंदाज आहे. शाळा, स्टेशनरी व्यावसायिक आणि शिक्षण यंत्रणेने संपूर्ण शिक्षण क्षेत्रच पोखरले गेले आहे. शाळा व्यवस्थापन आणि काही मोजके स्टेशनर्स यांचे साटेलोटे असल्याची पालकांची ओरड आहे.

*********************

पालकांना गणवेशासाठी दहा ठिकाणी फिरावे लागू नये म्हणून केलेली ती सोय आहे. त्याकडे सक्ती म्हणून पाहू नये, वह्या-पुस्तके खरेदीसाठीही आम्ही शाळामध्ये स्टॉल मांडतो. पालकांची गैरसोय होऊ नये एवढाच हेतू असतो.
तेथूनच गणवेश घेतला तर ठीक, अन्यथा शहर फिरले तरी दुसरीकडे गणवेश मिळणार नाही, अशी विशिष्ट यंत्रणाच तयार करण्यात आली आहे. याच दुकानांमधून गणवेश घेण्याची पालकांना सक्ती केली जाते. या बाबत शिक्षण विभागाचा अधिकारी यांना विचारणा केल्यास शालेय साहित्य खरेदी ठराविक दुकानांमधूनच करण्याची सक्ती केली जात असल्याबद्दल अद्याप एकाही पालकाने आमच्याकडे तक्रार केलेली नाही. तशी तक्रार आल्यास नक्कीच तातडीने अशा शाळांवर कारवाई केली जाईल असे संबंधित विभाग अशा शाळांची चौकशी करेल असे शिक्षण विभागा मार्फत उत्तर दिले जाते हे विशेष..

****************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

******************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here