*हुतात्मा राजगुरु यांचे स्मारक नव्या पिढीचे ऊर्जास्थळ व्हावे : सुधीर मुनगंटीवार*

0
15

***********************

*दर्जेदार, पारदर्शक आणि नियोजित वेळेत विकास कार्य पूर्ण करण्याचे निर्देश* 

***********************

* राजगुरुनगर (पुणे), दि.१ जुलै :*  

************************

हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अत्यंत मोलाचे आहे; अवघ्या २३ व्या वर्षी भारतमातेच्या स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणारा महान क्रांतिकारक आपल्या मातीत जन्माला आला हे आपलं भाग्य असून ज्या भुमीतून इतिहास घडवला अशा स्थळांचा नव्या पिढीसाठी प्रेरणा आणि ऊर्जा स्थळ म्हणून विकास करणे ही आपली जबाबदारी आहे; त्याअनुषंगाने हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांच्या जन्मस्थळाचा विकास ऊर्जा स्थळ म्हणून करणार असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले. हुतात्मा राजगुरु स्मारक विकास आराखडा बैठकीत ते बोलत होते. हुतात्मा स्मारकाचे काम पूर्णत्वास नेताना कर्तव्यात आणि निष्ठेत कुठेही कसूर होता कामा नये, शासन निधीची कमतरता पडू देणार नाही असेही ना. मुनगंटीवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुरातत्व विभाग संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्यासह स्मारक समितीचे सर्व सदस्य, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
ना. मुनगंटीवार यांनी स्मारकाचा आढावा घेताना त्या संदर्भातील सादरीकरण बघुन काही महत्वाच्या सूचना केल्या. यावेळी ना. मुनगंटीवार म्हणाले, “इन्कलाब जिंदाबाद !” चा नारा देत माँ भारतीच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्याला गोळ्या घालून क्रांती करणाऱ्या आणि असह्य वेदना सहन करुन वयाच्या २३ व्या वर्षी हौतात्म्य पत्करणाऱ्या हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मस्थळी राजगुरुनगर येथे भेट देऊन आज धन्य झालो. राष्ट्रभक्तीची ज्योत मनामनांत प्रज्वलित करणाऱ्या या वीर हुतात्म्यास अभिवादन करताना नवी प्रेरणा आणि स्फुर्ती मिळाली. हे स्थळ तरुणाईसाठी वीरतेचे केंद्र, पराक्रमाचे आणि शक्तीचे स्थळ म्हणून विकसित करण्याचा सरकारचा संकल्प केला असून तो शक्य तितक्या लवकर पूर्ण करायचा आहे.
ते पुढे म्हणाले, हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांच्या स्मारकाचा विकास आराखडा पूर्णत्वास नेत असताना पारदर्शकता, शास्त्रशुद्ध पद्धतीचं अनुकरण, उत्तम दर्जा याकडे गांभीर्याने लक्ष देत, उत्तम नियोजन आणि वेळेची मर्यादा या सर्व बाबींचे काटेकोरपणे पालन करायचे आहे. स्मारक समितीच्या सूचनांची दखल घेवून त्यावर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सुधीर मुनगंटीवार यांनी या स्मारकासाठी ज्या वेगाने काम हाती घेतले त्याबद्दल कौतुक करुन आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करुन देण्याची विनंती केली ; यावर सरकार या सरकारकडून निधी कमी पडू देणार नाही अशी स्पष्टोक्ती ना सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
अत्याधुनिक संसाधनांचा वापर करुन डिजीटल ग्रंथालय, लेजर शो, येथे भेट देणाऱ्यांना बघण्यासाठी थियेटर अशा सुविधांसह उत्तम तैलचित्रे असावीत अशा सूचनाही यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत दिल्या.

************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

**************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here