====================
चंद्रपूर दि.11 मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये आरक्षण देऊ नये. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यास आमचा विरोध नाही. अन्यथा कुणबी ओबीसी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असे निवेदन भारताचे प्रधानमंत्री ना. नरेंद्रजी मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, व ना. देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्या मार्फत दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. असे कुणबी महासंघाचे महासचिव दलित मित्र व आदिवासी सेवक डी. के. आरीकर यांनी सांगितले. 1990 मध्ये व्ही. पी. सिंग सरकारने ओबीसीना केंद्रात 27 टक्के तर महाराष्ट्रात 19 टक्के आरक्षण दिले परंतु त्याचीही अंमलबजावणी करण्यात आली नाही त्यामुळे स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा ओबीसी समाज आरक्षणापासून वंचितच राहिला. अशातच मराठ्यांचे पुढारी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेऊन सरकारने कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतल्या मुळे कुणबी व ओबीसी समाजात कमालीचा असंतोष उफाळून आला. या देशाच्या विकासात कुणबी व ओबीसी समाजाचा फार मोठा वाटा आहे परंतु सरकार कुणबी ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावून आपली पोळी भाजण्याचा कट रचत आहे याला ओबीसी समाजाने बळी पडू नये असे आवाहनही डी. के. आरीकर यांनी केले आहे.
========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
===================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793