================≈=≈=====
महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष्य अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा -२०१३जादूटोणाविरोधी कायद्याची अंमलबजावणी व्यापक स्वरूपात व्हावी .यासाठी ही महाराष्ट्र अंनिस जनसंवाद यात्रा सुरू झाली असून ,ती संपूर्ण महाराष्ट्रभर 90 दिवस जनजागरण व प्रबोधन करीत विविध जिल्ह्यात जनसंवाद करेल.
========================
महाराष्ट्रातील संत समाज सुधारकांचा वारसा पुढे नेणारी भारतीय संविधानानुसार वाटचाल करणारी आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी बाल ,युवा ,विद्यार्थ्यांनी विज्ञान ,निर्भयता ,नीती हे ब्रीदवाक्य अंगीकृत केले तरच उद्याचा भारत घडेल. त्यासाठी संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने जनजागरण प्रसार प्रचार माध्यम अभ्यासिका तयार करून व्यापक स्वरूपात राबवण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. केवळ इंडिया चे रूपांतर भारत असे करून चालणार नाही असे स्पष्ट मत विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन पर कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख ,जनमंच सदस्य .महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मार्गदर्शक सल्लागार रवींद्र तिराणिक यांनी व्यक्त केले .
यशवंतराव शिंदे महाविद्यालयात महाराष्ट्र अंनिस जनसंवाद मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. राज्य कार्यकारिणीच्या सदस्य नंदिनी जाधव यांनी जादूटोणाविरोधी कायद्याची संपूर्ण सविस्तर माहिती याप्रसंगी विशद केली. प्रसंगी बुवाबाजी व चमत्कार या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चाललेले थोतांड फसवीगिरी यावर प्रात्यक्षिक सादरीकरण सम्राट हटकर व भगवान रणदिवे यांनी केले.
याप्रसंगी जनसंवाद कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भद्रावती शिक्षण संस्थेचे सचिव डॉ . कार्तिक शिंदे, मुख्य मार्गदर्शक म्हणून राज्य कार्यकारणी सदस्य नंदिनी जाधव(पुणे), रामभाऊ डोंगरे (नागपूर ),सम्राट हटकर (नांदेड ),भगवान रणदिवे( सातारा), रवींद्र तिराणिक ,प्रमुख अतिथी म्हणून डॉ.राहुल साळवे तालुकाध्यक्ष निळकंठराव शिंदे महाविद्यालयाचे प्रा. डॉ. जयंत वानखेडे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन नामदेव रामटेके यांनी केले .आभार प्रदर्शन प्रा.आत्माराम देशमुख यांनी केले.
===================
२०ऑगस्ट २०१३ रोजी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खूनाला १० वर्ष पूर्ण होत आहेत .जादूटोणाविरोधी कायदा महाराष्ट्र राज्यात लागू होऊनही 10 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने जादूटोणाविरोधी कायदा राज्यव्यापी जनसंवाद यात्रा २० ऑगस्ट २०२३पासून पुणे येथील येथील म .विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून कायद्याची चित्रमय पोस्टर लावून सजवलेल्या गाडीला मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाली आहे . सदर जनसंवाद यात्रा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये कॉलेज, महाविद्यालय ,शाळा ,गाव ,संबंधित पोलीस प्रशासन मुख्यालय ,पोलीस स्टेशन स्तरावर जनसंवाद यात्रा पोहोचण्याचा प्रयत्न करीत असून ,यातून बाल युवा विद्यार्थी यांना जनजागरण प्रबोधन व कायदेशीर बाबी संदर्भात मार्गदर्शन करीत .पोलीस प्रशासनांना भेटी देत कायदेविषयक बाबी संदर्भात संवाद करीत. सविस्तर माहिती देत .जादूटोणा विरोधी कायद्याची चित्रमय पुस्तिका सहित असलेला जनसंवाद रथ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून अनेक स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793