* राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्षपदी शरद जोगी यांची नियुक्ती *

0
24

===================

राजुरा / कोरपना – 

====================
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा अध्यक्ष पदावर गडचांदूर येथील नगर परिषदेचे उपाध्यक्ष शरद जोगी यांची नियुक्ती तालुकास्तरीय सभेमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष नितीन भटारकर यांनी नियुक्तीपत्र देऊन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देत केली.

======================

तत्पूर्वी शरद जोगी यांनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पदाची जबाबदारी उत्कृष्ठरित्या पार पाडली होती. शरद जोगी यांच्या कार्यकाळात गडचांदूर येथील नगर परिषदेमध्ये नगरसेवक विजय होत उपाध्यक्ष पदाची माळा शरद जोगी यांच्या गळ्यात पडली होती. कामाचा अनुभव लक्षात घेता त्यांची विधानसभेच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सय्यद आबीद अली, महेंद्र चंदेल, संतोष देरकर, करण सिंग, प्रवीण काकडे, आकाश, मनोज धानोरकर, श्रीराम टेकाम, नरेश बोरडे, अशोक बोधे यांचे सह तालुक्यातील ग्रामीण भागातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नितीन भटारकर यांनी पक्ष संघटन व सर्वांना सोबत घेऊन पक्ष बांधणीच्या कार्याला पदाधिकाऱ्यांनी अधिक महत्त्व देऊन गाव पातळीपासून पक्ष बांधणीच्या कार्याला सुरू करण्याची गरज असल्याचे सांगितले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, प्रफुल पटेल, धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष संघटनाच्या कार्याला सुरुवात झालेली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या, कामगारांच्या प्रश्न याला प्राधान्य देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत अखेरच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचे सांगितले. जिल्ह्या मध्ये लवकरच तालुका व विधानसभेच्या नियुक्ती करण्यात येईल असे मत व्यक्त केले यावेळी त्यांनी सांगितले. प्रस्ताविक प्रवीण काकडे यांनी तर आभार योगेश कावळे यांनी मानले.

=========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

======================≈=

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here