* निराधार पेन्शनचे पैसे लवकर द्यावेत. -आम अदमी पार्टी बल्लारपुर.*

0
26

=========================

बुधवार दिनांक:-27/09/2023 रोजी बल्लारपुर चे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांच्या मार्गदर्शना खाली, उपाध्यक्ष अफ़ज़ल अली यांच्या नेतृत्वात मा. तहसीलदार, डॉ. कांचन जगताप यांना निवेदन देण्यात आले, गेल्या चार महिन्यांपासून बल्लारपुर शहरातील विधवा व वृद्ध लोकांना मिळणारे निराधार पेंशन त्यांना मिळाले नाही. स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ असणाऱ्या निराधार व्यक्तींना चार महिन्यांपासून हि पेंशन न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. ज्यांना काहीच आधार नसतो तो या पेंशनच्या आशेवर असतात, त्यांच्या समस्या लक्षात घेऊन चार महिन्यांचे निराधार पेंशन तात्काळ देऊन अश्या निराधार व्यक्तींना दिलासा द्यावा ही माहिती तातडीने मंत्रालयाला पाठवण्यात यावी आणि ही समस्या लवकरात लवकर सोळवावे अशी मागनी करण्यात आली.
यावेळी शहर अध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार, उपाध्यक्ष अफजल अली व गणेश सिलगमवार , सचिव ज्योतिताई बाबरे, सहसचिव आशीष गेड़ाम, संगठन मंत्री रोहित जंगमवार, युथ अध्यक्ष सागर कांबळे व इत्यादि उपस्थित होते.

==========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=======================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here