Home
Home चंद्रपूर नगरपरिषदेत जनप्रतिनिधी नाहीत म्हणून मुख्याधिकारी पूर्णवेळ हवा – आम आदमी पार्टी बल्लारपूर.

नगरपरिषदेत जनप्रतिनिधी नाहीत म्हणून मुख्याधिकारी पूर्णवेळ हवा – आम आदमी पार्टी बल्लारपूर.

0
90

======================

. 26/09/2023- मंगळवार
सध्या शहरात नगराध्यक्ष व नगरसेवक हि पदे रिक्त असताना प्रशासक म्हणून शहराची संपूर्ण जबाबदारी मुख्याधिकारी यांच्यावर आहे. अश्यावेळी मुख्याधिकारी नगरपरिषदेत उपस्थित राहत नाहीत.त्यामुळे नागरिकांच्या समस्यांबाबत अधिकारी व नगरपरिषदेचे कर्मचारी दुर्लक्ष करतात. यामुळे आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांनी मुख्याधिकारी यांची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. यावेळी निवेदनात पक्षाने असे नमूद केले कि मुख्याधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे माहिती अधिकार अर्जांबाबत योग्य कार्यवाही होत नाही. जोपर्यंत शाळा सुधारले जात नाही तोपर्यंत नवीन नगरपरिषद ईमारतीस आम आदमी पक्षाने विरोध दर्शविला होता, तेव्हा न.प ने दोन महिन्यात तीन शाळांच्या इमारतीची डागडुगी केली जाईल असे लेखी आश्वासन दिले. त्यासाठी अंदाजे 40 लाख इतकी रक्कम देखील मंजूर केली पण त्यावर अजूनही कुठलेच काम झाले नाही. शालेय पोषण आहारातील गैरव्यवहार व मदतनीसांच्या आर्थिक शोषणाकडेही मुख्याधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. नगरपरिषदेद्वारे देण्यात आलेल्या कंत्राटी मध्येही धांदली केली जात आहे. नगरपरिषदे अंतर्गत येणाऱ्या वसंत वाचनालयाची स्थिती देखील दयनीय आहे. कंत्राटी सफाई कामगारांना नियमानुसार वेतन मिळत नाही अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी तरतुदी दाखविल्या जातात पण त्यांना गरजेची संसाधने त्यांना दिले जात नाहीत. कलम 21 (अ) अंतर्गत 14 वर्षाखालील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद असताना नगरपरिषदेतर्फे इंग्रजी माध्यमाच्या प्रि-स्कूल कंत्राटी पद्धतीने सुरू करून वार्षिक 3500 रू फि आकारले जात आहे. अश्याप्रकारे मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्या बेजबाबदार पणामुळे जनतेच्या प्रश्नावर कोणतेच काम होत नाही परंतु ठेकेदारांचा फायदा साधला जात आहे. अश्याप्रकारचे आरोप करत आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे मागणी केली की बल्लारपूर शहराकरिता एक नवीन पुर्णवेळ मुख्याधिकारी नियुक्त करावा, कारण शहरात इतकी गंभीर प्रश्ने असताना सध्याचे मुख्याधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत तसेच शहरात त्यांची उपस्थिती पण फारच कमी दिसून येते. यावेळेस पक्षाच्या शिष्टमंडळात शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, जिला संगठन मंत्री भिवराज सोनी जी, उपाध्यक्ष गणेश सिलगमवार एवं अफजल अली, सचिव ज्योति बाबरे, संगठन मंत्री रोहित जंगमवार, यूथ अध्यक्ष सागर कांबळे, मिडिया प्रभारी सौरभ चौहान इत्यादि उपस्थित होते. 

======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* 

========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here