*चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा व भद्रावती मधे झाडू यात्रेचा जोरदार स्वागत; लढेंगे! जितेंगेच्या घोषणा.*

0
61

======================

चंद्रपूर, 10 ऑक्टोबर

=================

विदर्भाचा दौरा करून हिंगणघाट मार्गे आम आदमी पक्षाची विदर्भ झाडू यात्रा आज १० ऑक्टोबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाली. झाडू यात्रेचे जिल्हाचे प्रवेशद्वार खांबाडा येथे स्वागत करण्यात आले. त्यानंतर वरोरा आणि भद्रावती येथे जोरदार स्वागत करण्यात आले.

=======================

महात्मा गांधीजींच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबरपासून सेवाग्राम वर्धा येथून विदर्भ झाडू यात्रेला प्रारंभ झाला. यवतमाळ, वाशिम, बुलढाणा , अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा आणि हिंगणघाट येथून ही यात्रा आता चंद्रपूर जिल्ह्यात आली आहे. खांबाडा येथे झाडू यात्रेचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते उपस्थित होते. वरोरा येथे देखील झाडू यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी झाडू यात्रेचे जिल्हा संयोजक सुनील मुसळे आणि जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी स्वागत केले. वरोरा येथील सुरज भाऊ शाहा यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली. आनंदवन चौकात स्वागत, त्यानंतर हायवेने रत्नमाला चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि नंदोरी येथे स्वागत झाले. भद्रावती येथे शहर उपाध्यक्ष सुमीत हस्तक यांच्या नेतृत्वात झाडू यात्रेची जोरदार स्वागत करण्यात आले. महिला आघाडी तर्फे मान्यवरांच बाळासाहेब ठाकरे प्रवेश द्वार येथे स्वागत करण्यात आले. त्या नंतर नागमंदीर पर्यंत मिरवणुक काढण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज व गांधी चौकात महात्मा गांधी यांना पुष्प अर्पण करण्यात आले. भद्रावतीची आराध्य दैवत भद्रनाग स्वामी मंदिर येथे राज्याच्या पदाधिकारी व सर्व कार्यकर्त्यांनी आशीर्वाद घेतला. त्यानंतर जुना बस स्टॉप इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हार अर्पण करून सभा घेण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष सुरज शाहा यांनी सांगितले की, 1000/2000 रुपये खर्च करुन भीड दुसरे नेते दाखवत असेल पन आम आदमी पार्टी चे 50 इमानदार कार्यकर्त्यान मधे धमक आहे की ते 5000 कार्यकर्ते जोडू शकते व राज्याचे उपाध्यक्ष धनंजय शिंदे जी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी पक्षप्रवेश कार्यक्रम घेण्यात आला सौ.नयना गंधम, सौ.सरिता ताजने, जगन पारखी व अनेक लोकांनी आम आदमी पार्टी मधे पक्ष प्रवेश घेतला. संचालन सोनल पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा अध्यक्ष मयूर भाऊ राईकवार यांनी केले त्यांनी सांगितले की, आम आदमी पक्ष लवकरच चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय होईल. आम आदमी पक्ष हा लोकशाहीचा पक्ष आहे आणि तो सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करतो. एक एक व्यक्ती जोडू, आम आदमीला बळकट बनवू, अशी घोषणा देण्यात आले.

=========================

नंतर भद्रावतीच्या गेस्ट हाऊस इथे पत्रकार परिषद घेण्यात आले. त्यावेळी राज्याचे संघटक सचिव भूषणजी ढाकुलकर यांनी सांगितले की, येत्या काळात भद्रावती नगर परिषद मध्ये ताकदीने जातीचे राजकारण न करता सामान्य माणसाच्या प्रश्नांवर, घरपट्ट्यांच्या समस्यांवर, शिक्षणाच्या समस्यांवर, रस्त्यांच्या समस्यांवर, ताकदीने निवडणूक लढू व सर्वसामान्य जनतेला दिल्ली व पंजाब प्रमाणे एक नवीन पर्याय देऊ यावेळी आम आदमी पार्टीचे राज्याचे पदाधिकारी राज्याचे उपाध्यक्ष धनंजय शिंदे, राज्य संघटक सचिव मोडक साहेब, संदीप देसाई, भूषण ढाकुलकर, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मयूर राईकवार, जिल्हा उपाध्यक्ष व राजुरा विधानसभा अध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, बल्लारपूर शहराध्यक्ष रवी पुप्पलवार भद्रावती शहराध्यक्ष सुरज शाहा, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक, सैम्युल गंधम, शहर उपाध्यक्ष आशिष तांडेकर, शहर संघटन मंत्री अनिल कुमार राम, शहर सचिव विजय सपकाळ, शहर कोषाध्यक्ष सरताज शेख, शहर सहसचिव सचिन पाटील, तालुकाध्यक्ष सोनल पाटील, तालुका उपाध्यक्ष विनीत निमसरकर, तालुका कोषाध्यक्ष राजकुमार चट्टे, महिला आघाडी तर्फे शहर महिला अध्यक्ष प्रतिभाताई कडूकर, महिला कोषाध्यक्ष रेखा गेडाम, विमल कवाडे, कल्याणी गुळधे, अपर्णा वाघमारे, मंगला मोहितकर, राजश्री खामनकर, मंजू दुधलकर, सुरेखा मिलमिले, कविता ठाकरे, माया ठाकरे, ज्योती बाबरे, सलमा सिद्धीकी, कार्यकर्ते मंगेश भाऊ खंडाळे, अतुल भैसारे, केशवभाऊ पचारे, रितेश नगराळे, राजेश भाऊ नरवडे, वसीम कुरेशी निखिल जट्टलवार, आमिर शेख, बाळूभाऊ बांदुरकर, प्रदीप भाऊ लोखंडे, चेतन भाऊ खोब्रागडे, असिफ शेख, अफजल अली, सागर कांबळे, संजय भाऊ सातपुते, डोरी भाऊ स्वामी, घनश्याम भाऊ गेडाम, विनोद भाऊ लांडगे, राजू भाऊ कोड़ापे, अतुल रोडगे, शुभम रामटेके, शुभम भोस्कर, विकी मुळेवार, दिलीप कापकर, सुभाष कोडापे, मंगेश निखाडे, सचिन मुरसकर, अनिल कोकुडे, गौरव चांदेकर, बाळकृष्ण पिंपळकर, आनंद पुसाटे व इतर कार्यकर्ते उपस्थीत होते.

========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here