बल्लारपूर विधानसभेला विकासाच्या मार्गावर कायम अग्रेसर ठेवणार – ना. सुधीर मुनगंटीवार

0
38

=========================

निरंतर विकासासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास
बल्लारपूर येथे 4 कोटींच्या रस्ता बांधकामाची पायाभरणी

======================
चंद्रपूर, दि. 1 : ‘बल्लारपूर विधानसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून मला विकास करण्याची संधी मिळाली आहे. बल्लारपूर हा तालुका महाराष्ट्राच्या एका टोकाला असला तरीही विकासाच्या बाबतीत राज्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत अग्रेसर आहे. मी या विधानसभेच्या निरंतर विकासाचे ध्येय डोळ्यापुढे ठेवले आहे, त्यामुळे भविष्यात सुद्धा बल्लारपूरची विकासाची घोडदौड अशीच कायम राहील,’ अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
=======================
बल्लारपूर येथील सिताबाई सावरकर चौक ते डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम चौक पर्यंतच्या सिमेंट रस्त्याच्या बांधकामाची पायाभरणी करतांना ते बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल,तहसीलदार डॉ. कांचन जगताप, न.प. मुख्याधिकारी विशाल वाघ, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, भाजपा शहर अध्यक्ष काशिनाथ सिंह, देविदास उमरे, विकास दुपारे, मनिष पांडे, नीलेश खरबडे, अरुण वाघमारे आदी उपस्थित होते.
=======================
कितीही विकास केला तरी बल्लारपूर येथील नागरिकांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, अनेक वर्षांपासून शहरातील डॉ. झाकीर हुसेन वॉर्ड ते राजेंद्र वॉर्ड पर्यंतच्या सिमेंट रस्त्याची नागरिकांची मागणी होती. त्यानुसार या रस्त्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सुचना सा.बा. विभागाला दिल्या व 4 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. निधी मंजूर झाला असला तरी रस्त्याची गुणवत्ता आणि दर्जा यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेसोबतच स्थानिक नागरिकांची सुध्दा आहे. कारण आपल्या अनेक पिढ्या या परिसरात राहात आल्या आहेत व भविष्यातसुध्दा राहणार आहे. त्यामुळे रस्त्याचे काम हे उत्तमच व्हायला पाहिजे, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने विशेष लक्ष द्यावे, अशा सुचना पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या.
========================
घरकुल पट्टे देण्यासाठी विशेष मोहीम : वर्षानुवर्षे महसूलच्या जमिनीवर वास्तव्य करणा-या कुटुंबाना घरकुल पट्टे देण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र रेल्वे आणि वन विभागाच्या जमिनीबाबत केंद्र सरकारचे नियम आहेत. त्यामुळे या जमिनीवरील घरकुल पट्टे देण्यासाठी केंद्र सरकारसोबत बोलणी सुरू आहे, असे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
========================
एकाच दिवशी तीन कामांचे भुमिपूजन  : बल्लारपूर येथे एकाच दिवशी मिनी स्टेडीयमच्या कामाचे भुमिपूजन (1 कोटी 29 लक्ष), सिमेंट रस्त्याची पायाभरणी (4 कोटी) आणि न.प. इमारतीच्या बांधकामाची पायाभरणी (10 कोटी) करण्यात आली आहे.
==========================
स्थानिकांचा सत्कार : यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते देवराव निंबेकर, प्रभाकर वैद्य, प्रकाश जमदाडे, प्रभाकर पोटे, काशीनाथ पचारे, देविदास उमरे, मारोती वाळके, सदर्शन मोगराम, मोहम्मद मुसाजी आदींचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
=========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here