**चंद्रपूर: अंमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक**

0
34

======================

चंद्रपूर, 1 नोव्हेंबर 2023: चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने अवैध अंमली पदार्थाच्या वाहतुकीवर कारवाई करत दोन अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे. या गुन्हेगारांकडे 19,80,000 रुपयांचे M. D. (मॅफेड्रान) पॉवडर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.

========================

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की, दोन इसम खाजगी कारने नागपुर वरून एम. डी. ड्रग्ज पॉवडर विक्री करीता सोबत बाळगुन पडोली चौक येथे येणार आहेत. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी पडोली चौकात सापळा रचला. नागपुरहून येणाऱ्या एका चारचाकी वाहनाला थांबवून तपास केला असता, वाहनातून 198 ग्रॅम M. D. (मॅफेड्रान) पॉवडर अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.

======================

या कारवाईत शाहरूख मतलूब खान (वय 28, रा. शालीकग्राम नगर, घुग्घुस) आणि साहील ईजराइल शेख (वय 28, रा. शालीकग्राम नगर, घुग्घुस) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक लोखंडी तलवार, दोन विव्हो कंपनीची मोबाईल आणि 8,00,000 रुपयांची कार देखील जप्त करण्यात आली आहे.

=====================

या गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि नागेश चतरकर हे करीत आहेत.

======================

**पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई**

======================

या कारवाईत पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनि नागेश चतरकर, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि अतुल कावळे, पोहवा धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, अजय बागेसर, प्रशांत नागोसे, भुषण बारसिंगे तसेच पो. स्टे. सायबर चे छगन जाभुळे, अमोल सावे, प्रशांत लारोकर यांनी सहभाग घेतला.

=====================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=======================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here