*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार अंगीकारून समाजाने एकजूट व्हावे- मेघश्याम पेटकुले*

0
46

========================

जुनोना येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्सहात साजरी

=========================

         * जुनोना* 

===================

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा त्याग समाज कधीही विसरणार नाही. त्याकाळी सावित्रीबाईंनी केलेल्या संघार्षामुळे आज महिला सुशिक्षीत होऊ शकल्या. आज त्यांची जयंती साजरी करत असतांना केवळ हा उत्साह एक दिवसापुरता मर्यादित राहता कामा नये. आजच्या दिवशी सावित्रीबाई फुले यांचे विचार अंगीकारुन समाजाने एकजुटीने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माळी महासंघाचे चंद्रपूर जिल्हा शहर उपाध्यक्ष मेघश्याम पेटकुले यांनी केले.

=======================

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त जुनोना येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते अध्यक्ष स्थानावरुन बोलत होते. या कार्यक्रमाला उपाध्यक्ष बेबीताई वाडगुरे, कोषाध्यक्ष मनोज लेनगुरे, सदस्य अजय वाढई, सचिन जेंगठे, परशुराम आदे, विशाल लेनगुरे, वीणा ढोले, मुकेश नागोसे, माया आदे, अर्चना चौधरी, प्रदीप मोहुर्ले, आदींची उपस्थिती होती.

========================

यावेळी पुढे बोलताना मेघश्याम पेटकुले म्हणाले की, देशाला शिक्षणाचे महत्व पटवून देणा-या माळी समाजात आमचा जन्म झाला याचा आम्हाला अभिमान आहे. महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे आमचे दैवत आहे. त्यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले. मात्र आज आमचा समाज विखूरला जात आहे. ही चिंतेची आणि चिंतनाची बाब आहे. अशा आयोजनातून समाज एकत्रित येतो आणि याबाबत चिंतन होण्याची गरज यावेळी जुनोना सत्यशोधक माळी समाज अध्यक्ष मेघश्याम पेटकुले यांनी व्यक्त केली. यावेळी क्रांती मशाल शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले सभागृहापासून या शोभायात्रेला सुरवात झाली. गावाचा वळसा घालुन सदर शोभायात्रा पून्हा सदर सभागृह जवळ पोहचली. यावेळी क्रांतीज्याती सात्रिवीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले. या कार्यक्रमाला माळी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

=======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

======================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here