*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत*

0
28

=======================

    *चंद्रपूर*

========================

क्रांतीज्याती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त माळी समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या शोभायात्राचे गांधी चैक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी माळी समाज बांधवांना फळ वाटप करण्यात आले.
यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे, युवा नेते अमोल शेंडे, आदिवासी विभागाचे जिल्हा अध्यक्ष जितेश कुळमेथे, शहर संघटक संजय निकोडे, यंग चांदा ब्रिगेड महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा वंदना हातगावकर, अल्पसंख्यांक युवा आघाडीचे शहर अध्यक्ष, राशिद हुसैन, शहर संघटिका सविता दंडारे, नकुल वासमवार, सुरेंद्र अंचल, देवा कुंटा, सतनाम मिर्धा, ताहीर हुसैन, कार्तिक बोरेवार, शंकर दंतुलवार, आशा देशमुख, शांता धांडे, अनिता झाडे, वंदना हजारे, वैशाली मद्दीवार, माधुरी बावणे, दिनेश इंगडे, नितेश गवळी, यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या पुरुष, महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देत त्यांना शिक्षित करणार्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी करण्यात आली. चंद्रपूरातही माळी समाज बांधवांच्या वतीने शहरातुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. सदर शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गांधी चैक येथे स्वागत मंच उभारण्यात आला होता. सदर शोभायात्रा यंग चांदा ब्रिगेडच्या स्वागत मंचाजवळ पोहचताच यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी शोभायात्रेचे स्वागत केले. यावेळी महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यापर्ण करुन अभिवादन केले. यावेळी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने फळ वाटप करण्यात आले.
========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here