*यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी*

0
20

======================

      *चंद्रपूर*

=======================

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन त्यांना अभिवादन केले.
यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर अध्यक्षा वंदना हातगावकर, बहुजन आघाडीच्या विमल काटकर, वैशाली मद्दीवार, चंदा ईटनकर, अनिता झाडे,  नीलिमा वनकर,  शमा काझी,  माधुरी बावणे,  माधुरी निवलकर आदींची उपस्थिती होती
यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, क्रांतीज्याती सावित्रीबाई फुले हे एक महत्वपूर्ण भारतीय समाजसेविका आणि शिक्षिका होत्या. ज्यांनी 19 व्या शतकात भारतीय समाजातील उपेक्षित वर्गांसाठी काम केलें. त्यांनी स्त्रियांना शिक्षीत करत, समाज सुधारणा केली. मुलींसाठी शिक्षणाचे दार उघडे करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत असतांना त्यांनी महिलांना मिळवून दिलेल्या हक्काची महिलांनी नेहमी जाण ठेवली पाहिजे, महिलांनी शिक्षित होण्यासह जागृत होणे आवश्यक असून आता सावित्रीच्या लेकींनी सामाजिक क्षेत्रातही सक्रिय सहभाग घेण्याची गरज यावेळी बोलताना आमदार जोरगेवार त्यांनी व्यक्त केली. यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीचे काम कौतूकास्पद असून समाजातील गरजू महिलांपर्यंत पोहचून त्यांना शक्य ती मदत करण्याचे काम त्यांच्या वतीने केल्या जात असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

====================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=======================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here