*महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयामध्ये राज्य क्रीडा दिन साजरा*

0
39

=========================

           *बल्लारपूर*

=======================

बल्लारपूर :- महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त राज्य क्रीडा दिन साजरा करण्यात आला. मकर संक्रमण उत्सव तसेच राज्य क्रीडा दिन निमित्त प्रा.डॉ. बालमुकुंद कायरकर संचालक क्रीडा विभाग यांच्या नेतृत्वात आंतरवर्गीय क्रीडा स्पर्धा घेतली. या स्पर्धेमध्ये बी.ए. बी.कॉम. चे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला .तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला . पतंग स्पर्धेमध्ये बी ए. प्रथम च्या विद्यार्थानीं विजय प्राप्त केला. नायलॉन तसेच चायनीज मांजावर बंदी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतः मांजा तयार केला आणि या पतंग स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. पतंग स्पर्धेमध्ये प्रा. शुभांगी भेंडे शर्मा यांनी प्रथम पुरस्कार प्राप्त केला . विद्यार्थ्यांमध्ये बीकॉम च्या विद्यार्थ्यांनी प्रथम पुरस्कार प्राप्त केला. क्रिकेट स्पर्धेमध्ये बीए द्वितीय व बीकॉम तृतीय च्या विद्यार्थ्यांनी प्रथम पुरस्कार प्राप्त केला. आपल्या वक्तव्यामध्ये विद्यार्थ्यांनी अशा प्रकारची स्पर्धा नेहमी महाविद्यालयात व्हावी जेणेकरून उत्साह वाढेल असे म्हटले. खशाबा जाधव यांनी हेलसिंकी ओलंपिक मध्ये कुस्तीत आपला प्रभाव दाखवून व्यक्तिगत पदक मिळविणारे स्वतंत्र भारताचे पहिले अथलिटिक होते. त्यांच्या जयंती निमित्त राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या उत्सवामध्ये महाविद्यालयाचे सगळे प्राध्यापक उपस्थित होते.

========================

* चंदन देवांगन विशेष प्रतिनिधी* 

=======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=======================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here