*चंद्रपूर प्रादेशिक अधिकारी कार्यालय वाराबुक्क्या प्रादेशिक अधिकाऱ्याच्या हाती*

0
34

====================

चंद्रपूर, २३ जानेवारी २०२४ : चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी कार्यालय वाऱ्यावर आहे. प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव वारंवार कोणतीही पूर्वसूचना न देता सुटीवर जातात. यामुळे कार्यालयाचे काम बेभरवसे सुरू आहे. याबाबत संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

====================
प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांनी गेल्या काही महिन्यांत अनेकदा सुट्टी घेतली आहे. या सुट्ट्यांचे नियोजनही त्यांनी केलेले नसते. त्यामुळे कार्यालयात कामकाजाची अडचण निर्माण होते.
याशिवाय, कार्यालयातील फील्ड अधिकारी देखील कामात दिरंगाई करीत आहेत. यामुळे कारखाने आणि औद्योगिक प्रकल्पांवर नियमांचे पालन केले जात नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होण्याची भीती आहे.
===================
बेले यांनी प्रादेशिक अधिकारी आणि फील्ड अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, पर्यावरणाचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या वर्तनामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे.
याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=======================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here